Join us  

नील नितीन मुकेश, चंकी पांडेनंतर प्रभासच्या ‘साहो’ला मिळाला तिसरा ‘भिडू’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 7:48 AM

अभिनेत्री श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश आणि चंकी पांडेनंतर ‘बाहुबली’ प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटासाठी चौथा चेहरा मिळाला आहे. ...

अभिनेत्री श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश आणि चंकी पांडेनंतर ‘बाहुबली’ प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटासाठी चौथा चेहरा मिळाला आहे. हा चेहरा म्हणजे दुसरा-तिसरा कोणीही नसून, बॉलिवूडचा भिडू जॅकी श्रॉफ आहे. होय, प्रभासच्या ‘साहो’मध्ये जॅकीदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तेही नीलप्रमाणे चित्रपटात प्रभासच्या नाकात दम करताना दिसणार आहेत. सूत्रानुसार ‘साहो’मध्ये तीन असे ग्रे कॅरेक्टर आहेत जे प्रभासच्या अडचणीत भर पाडणारे असतील. चंकीची भूमिका खूपच डार्क शेडवाली असेल. तर नीलची भूमिका एक टेक सॅव्ही व्हिलनची असेल. तर दुसरीकडे जॅकीदाची भूमिका खूपच रंजक असणार आहे. प्रभासच्या आयुष्यातील अडचणींमध्ये भर टाकणारा खलनायक ते चित्रपटात साकारणार आहेत. चित्रपटासाठी शूटिंग सध्या हैदराबाद येथे सुरू आहे. प्रभासने काल त्याच्या ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली. त्याने लिहिले होते की, ‘जवळपास साडेचार वर्षांनंतर तो त्याच्या ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करीत आहे.’ या अगोदर प्रभास त्याच्या ‘बाहुबली’ प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता. तर जॅकीदा पुढच्या आठवड्यात टीम ‘साहो’ला जुळणार आहेत.  जॅकीदाने या वृत्तास दुजोरा देताना म्हटले की, ‘मी प्रभासच्या ‘साहो’मध्ये काम करणार आहे, ही माझ्यासाठी खूपच सन्मानाची बाब आहे. प्रभास सद्यस्थितीत भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने माझी या चित्रपटासाठी निवड केल्याने मी आनंदी आहे. मी ‘बाहुबली’चे दोन्ही भाग बघितले आहेत. दोन्ही चित्रपट खूपच मनोरंजक आहेत. हे दोन्ही चित्रपट बघून मला माझे बालपण आठवले,’ असेही जॅकीदाने म्हटले आहे. सध्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रभास ‘साहो’साठी इतर पात्रांचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या हिरोईनचे नाव निश्चित करण्यात आले. या भूमिकेसाठी बºयाच अभिनेत्रींच्या नावांची चर्चा होती. अखेर श्रद्धा कपूर हिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहेत. श्रद्धा आणि प्रभास पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार असून, दोघांचा रोमान्स बघणे प्रेक्षकांना आवडणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलिज होणार आहे.