नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘सच कहूं तो’मधून उलगडणार त्यांचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 04:33 PM2021-05-23T16:33:41+5:302021-05-23T16:35:47+5:30

आपल्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Neena Gupta announces her autobiography Sach Kahun Toh | नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘सच कहूं तो’मधून उलगडणार त्यांचं आयुष्य

नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘सच कहूं तो’मधून उलगडणार त्यांचं आयुष्य

googlenewsNext
ठळक मुद्देनीना यांनी ‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या.

आपल्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होतेय. नीना यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचा एक व्हिडीओ व फोटो शेअर केला आहे.
‘सच कहूं तो’  (Sach Kahun Toh)असे त्यांच्या या आत्मचरित्राचे नाव आहे. पेंगुइन इंडिया हे आत्मचरित्र प्रकाशित करतेय.
 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील दिवस, 80 च्या दशकात मुंबईत जाण्याचा निर्णय, लग्नाआधी आई बनण्याचा निर्णय, बॉलिवूडमधील राजकारण अशा अनेक गोष्टींवर त्यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. नीना गुप्तांचे हे आत्मचरित्र येत्या 14 जूनला प्रकाशित होत आहे. (Neena Gupta  autobiography )

4 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या नीना यांनी ‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या एका ‘बोल्ड’ निर्णयाने. 8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा.
8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. आजही नीना तितक्याच बोल्ड आहेत. साठी ओलांडल्यानंतरही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यात आहेत. माझ्या बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या.

माझ्या  बंडखोरीने माझे करिअर उद्धवस्त केले...
माझ्या बंडखोरीने माझे करिअर उद्धवस्त केले, हे खुद्द नीना यांचे शब्द आहेत. एका मुलाखतीत त्या बोलल्या होत्या. इंडस्ट्रीत तुमची पर्सनॅलिटी पाहून तुम्हाला भूमिका दिल्या जातात. मी एक बंडखोर महिला होते. यामुळे मला सतत निगेटीव्ह भूमिका दिल्या. पहिल्या कमर्शिअल फिल्ममध्ये मी बबली गर्ल साकारली होती. यानंतर मला तसेच रोल ऑफर केले गेलेत. चोली के पीछे है क्या...या गाण्यानंतरही मला तशाच गाण्यांची ऑफर आली. पण टीव्हीने मला वाचवले. त्याकाळात टीव्हीचा आधार मिळाला नसता तर मला माघारी परतावे लागले असते,  असे त्या म्हणाल्या होत्या.

Web Title: Neena Gupta announces her autobiography Sach Kahun Toh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.