रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेला चित्रपट सूर्यवंशीची घोषणा आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढली आहे. या चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्यात आता असं समजतंय की या चित्रपटातून अभिनेत्री नीना गुप्ता बाहेर पडल्या आहेत. या सिनेमासाठी त्यांना साईन करून घेतले होते. तीन दिवसांचे शुटिंगही झाले होते. त्यानंतर त्यांना डच्चू देण्यात आला.इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, सूर्यवंशी चित्रपटात नीना गुप्ता यांना अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आले होते. यावर कामही सुरू झाले, पण नंतर एक दिवस त्यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचे खुद्द नीना गुप्ता यांनी माहिती दिली.
अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मधून नीना गुप्ता यांना दिला डच्चू, याबाबत त्यांनीच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:20 IST