Join us

नव्या अभिनेत्रींना पाहून साठीतल्या ‘या’ अभिनेत्रीचा होतो जळफळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 1:05 PM

आपल्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या याअभिनेत्रीची ताजी मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे.

ठळक मुद्दे  नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत नीना झळकल्या.

आपल्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री नीना गुप्ता यांची ताजी मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. होय, या मुलाखतीत नीना यांनी बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींबद्दल असे काही म्हटले की, त्याची चर्चा रंगली. बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींना पाहून माझा जळफळाट होतो. मी आणखी लहान असायला हवे होते...,असे नीना म्हणाल्या.  ‘बधाई हो, वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी ही माझ्या आयुष्याला मिळालेली नवी ‘लीज’ आहेत. मला योग्य भूमिका मिळाल्या याचा आनंदच आहे. पण दुसरीकडे मी काहीशी दु:खीही आहे. मी आणखी लहान असते तर... अनेक माध्यमांत मला काम करता आले असते. त्यामुळेच मला नव्या हिरोईन्सला चांगले काम करताना बघितले की माझा जळफळाट होतो,’ असे नीना म्हणाल्या.

बधाई हो या चित्रपटाबद्दलही त्या बोलल्या. हा सिनेमा मला अगदी योगायोगाने मिळाला. ही भूमिका माझ्या वाट्याला आली नसती तर मी जिथे होते तिथेच खितपत पडून राहिले असते. चित्रपट हा व्यवसाय आहे. तुम्ही एखाद्या भूतिकेत फिट बसत असाल तरच तुम्हाला काम मिळेल, असेही नीना म्हणाल्या.

  नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत नीना झळकल्या. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या एका ‘बोल्ड’निर्णयाने.

8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा.

8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. आजही नीना तितक्याच बोल्ड आहेत. साठी ओलांडल्यानंतरही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यात आहेत. माझ्या  बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :नीना गुप्ता