Join us

नीना शोधतेय जुन्या सहकलाकाराला, नुकताच दिसला होता दीपिकाच्या वडिलांच्या भूमिकेत, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:43 AM

त्रिकाल या चित्रपटातील सहकलाकाराचा फोटो पोस्ट करत हा आता कुठे आहे असे नीनाने विचारले आहे. त्यावर त्याने नुकतीच दीपिका पादुकोणच्या वडिलांची भूमिका चित्रपटात साकारली असल्याचे फॅन्स तिला सांगत आहेत.

ठळक मुद्देनिखिलने अनेकवर्षांनी 2015 मध्ये तमाशा या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तो दीपिका पादुकोणच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. 

नीना गुप्ता सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने गेल्या वर्षी बधाई हो हा हिट चित्रपट दिला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. या चित्रपटासाठी तिला विविध पुरस्कार देखील मिळाले. आता नीना शुभ मंगल ज्यादा सावधान या तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेसचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण त्याचसोबत तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

नीना गुप्ता तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलीच ॲक्टिव्ह असते. नुकताच तिने 1985 च्या त्रिकाल या चित्रपटातील तिचा आणि तिच्या सहकलाकाराचा फोटो पोस्ट केला असून या सोबत लिहिले आहे की, त्रिकालमधील मी आणि निखिल... निखिल तू आता कुठे आहेस? कसा दिसतोस?

नीनाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केले आहे. त्रिकाल या चित्रपटातील हा दुर्मिळ फोटो पाहायला मिळाला असल्याने नीनाचे अनेक फॅन्स प्रचंड खुश झाले आहेत. बधाई हो या चित्रपटातील तिचा सहकलाकार आयुष्मान खुराणाने या पोस्टवर हार्टची इमोजी पोस्ट केली आहे तर एका फॅनने कमेंटमध्ये लिहिले आहे की, निखिलने तमाशा या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत काम केले होते तर एकाने त्रिकाल हा चित्रपट खूपच छान होता तसेच या चित्रपटातील तुमच्या दोघांची जोडी मस्तच वाटत होती असे देखील कमेंटमध्ये लिहिले आहे. या चित्रपटाच्या एका फॅनने कमेंटमध्ये लिहिले आहे की, मी या चित्रपटाची खूप मोठी फॅन असून हा चित्रपट मी माझ्या लहानपणी अनेकवेळा टिव्हीवर पाहिला आहे. 

त्रिकाल या चित्रपटात नीनाने मिलजेनरिया ही भूमिका साकारली होती तर निखिल रुझ या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटासाठी श्याम बेनेगल यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रेक्षकांना गोव्यातील एक कथा पाहायला मिळाली होती. 

निखिलने अनेकवर्षांनी 2015 मध्ये तमाशा या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तो दीपिका पादुकोणच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. 

 

टॅग्स :नीना गुप्ता