Join us

"शारिरीक संबंध ठेवायला..." कास्टिंग काऊचवरील नीना गुप्तांच्या 'त्या' वक्तव्यावर भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 3:33 PM

कोणत्याही नवीन अभिनेत्रीला काम मिळवण्यासाठी....

अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचे विचार आणि राहणीमान खूपच बोल्ड आहे. वयाच्या साठीतही त्या कोणतीच भूमिका करायला नाही म्हणत नाहीत. लवकरच त्या अनुराग बासू दिग्दर्शित 'मेट्रो..इन दिनो' सिनेमात दिसणार आहेत. सिनेमाच्या निमित्ताने स्टारकास्ट सध्या प्रमोशन करत आहे आणि आपल्या वैयक्तिक, प्रोफेशनल आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलत आहेत.

दरम्यान नीना गुप्तांची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचवर आपले विचार मांडले. मात्र आता त्यांना आपल्या एका जुन्या वक्तव्याने टीकेला सामोरं जावं लागतंय. २०२१ मध्ये नीना गुप्ता एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, कोणत्याही नवीन अभिनेत्रीला काम मिळवण्यासाठी कोणाशी शारिरीक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली जात नाही. ते पूर्णपणे तिच्यावर अवलंबून असतं की तिने हे करायचं की नाही.'

तसंच त्या पुढे म्हणाल्या, 'इथे कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. तुम्ही नक्की काय करु शकता हे तुम्हालाच ठरवायचं असतं. हे खूप सरळ आहे. जर तुम्ही नाही म्हणालात तर बाकी १० मुली हो म्हणण्यासाठी तयार आहेत. तुम्ही शारिरीक संबंध ठेवाल आणि तुम्हाला रोल मिळेल हे गरजेचं नाही. ते तुम्हाला एखाद्या गर्दीत छोटीशी भूमिका ऑफर करतील. हा बिझनेस आहे. इथे काम करायचं ही तुमची निवड आहे.'

नीना गुप्ता यांचं हेच जुनं विधान आता पुन्हा व्हायरल होतंय. त्यांच्या वक्तव्यानंतर नेटिझन्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. कोणी त्यांच्यावर टीका करत 'बीमार मानसिकता' असं म्हटलंय. तर कोणी 'माझ्या मनातील तुमची इज्जत उतरली' अशीही कमेंट एकाने केली आहे.

टॅग्स :नीना गुप्ताकास्टिंग काऊचसोशल मीडिया