Join us

'लस्ट स्टोरीज 2' मध्ये नीना गुप्ता आजीच्या भूमिकेत, स्वत:चाच अनुभव सांगत म्हणाल्या, 'मला वाटायचं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 11:27 AM

लग्न करण्याआधी टेस्ट ड्राईव्ह का नसते? अशा बिन्धास्त डायलॉगमधून पहिल्याच ट्रेलरमध्ये नीना गुप्ता यांचा प्रेक्षकांना परिचय होतो.

काही दिवसांपूर्वीच 'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) चा ट्रेलर प्रदर्शित झाला. बोल्ड विषयामुळे सिनेमाचा पहिला भागही चर्चेत होता. तर आता दुसरा ट्रेलर पाहूनही प्रेक्षक आश्चर्यचकीत  झालेत. कारण सिनेमात काजोल, नीना गुप्ता या दिग्गज अभिनेत्रींनीही बिंनधास्त भूमिका केली आहे. ट्रेलरमधूनच नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी लक्ष वेधून घेतलंय. त्यांनी सिनेमात आज्जीची भूमिका केली असून त्यांच्या तोंडी चांगलेच बोल्ड डायलॉंग्स आहेत. 'मॉडर्न आज्जी'चा रोल त्यांनी केलाय.

एखादी छोटी गाडी खरेदी करण्याआधी टेस्ट ड्राईव्ह करताच ना, मग लग्न करण्याआधी टेस्ट ड्राईव्ह का नसते? अशा बिंन्धास्त डायलॉगमधून पहिल्याच ट्रेलरमध्ये नीना गुप्ता यांचा प्रेक्षकांना परिचय होतो. त्यांची ही भूमिका सिनेमात बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'जे मी सांगतेय ते जर एखादी आज्जी सांगत नसती तर त्याचा काहीच परिणाम झाला नसता. एका वयस्कर व्यक्तीने या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. जे आम्ही सिनेमाच्या माध्यमातून दाखवलं आहे. तरुणांसोबत शारिरीक संबंधांविषयी चर्चा करणं खूप गरजेचं आहे.'

नीना गुप्ता यांनी स्वत:चाच अनुभव शेअर करत सांगितले, 'मला कॉलेजपर्यंत शारिरीक संबंधांविषयी माहितच नव्हतं किंवा अर्धवट माहिती होती. मी १२-१३ वर्षांची झाले नाही तोपर्यंत मी माझ्या आईवडिलांना वेगवेगळ्या खोलीत झोपलेलं बघितलं नाही. माझ्या आईने कधीच मला या विषयावर माहिती दिली नाही. अगदी पिरीएड्स काय असतात हे सुद्धा तिने मला समजावलं नव्हतं.'

त्या पुढे म्हणाल्या, 'कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं की फक्त किस केल्यानेच महिला गरोदर होतात. आधीच्या काळी मुलींना लग्नाआधी हे माहितच नसायचं. मुलं जन्माला घालणं तुमचं काम आहे असंच त्यांना सांगितलं जायचं. आजही परिस्थिती फार काही बदललेली नाही. म्हणूनच मला वाटतं 'लस्ट स्टोरीज 2' महत्वपूर्ण आहे आणि माझी भूमिका अशा विषयांनी वाचा फोडत आहे.'

टॅग्स :नीना गुप्ताबॉलिवूडलस्ट स्टोरीज