चित्रपट निर्माते मधु मंटेना(Madhu Mantena) यांनी पुन्हा एकदा वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोट घेतल्यानंतर चार वर्षांनी मधु मंटेना यांनी त्यांची दीर्घकाळाची मैत्रीण इरा त्रिवेदीसोबत लग्न केले. मधुच्या दुसऱ्या लग्नावर मसाबा गुप्ताची आई नीना गुप्ता यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नीन गुप्ता यांनी केली कमेंटमधु मंटेना यांनी 11 जून रोजी इरा त्रिवेदीशी साध्या पद्धतीने लग्न केले. मधु यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा अनसीन फोटो शेअर करून स्वतःला 'पूर्ण' झाल्याचं म्हटलं आहे. या पोस्टवर नीना गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मधु यांच्या पोस्टवर लिहिले- "अभिनंदन."
मधू मंटेनाने पहिलं लग्न फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत केले होते. मधू आणि मसाबाने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले. या वर्षी जानेवारीमध्ये मसाबाने 'बॉम्बे वेल्वेट' फेम अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले, जो आदिती राव हैदरीचा पूर्वाश्रमीचा पती आहे.
मधु मंटेनाच्या लग्नाच्या रिसेप्शनला आमिर खान, हृतिक रोशन, राजकुमार राव आणि कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मधू मंटेनाने अनुराग कश्यप, विकास बहल आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्यासोबत, 'फँटम' फिल्म्सची सह-स्थापना केली, ज्याने 'क्वीन', 'एनएच 10', 'मसान' आणि 'लुटेरा' सारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली.