प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते. त्यामुळंच की काय प्रत्येक व्यक्तीसाठी करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा असतो. नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला असल्याचे सांगितले. बधाई हो सिनेमा माझ्यासाठी ख-या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला. या सिनेमाच्या आधी अशीही वेळ आली होती की, सिनेमातर सोडाच टीव्हीच्याही ऑफर मिळणे बंद झाले होते. सगळे नुसते बाता मारायचे पण काम कोमी द्यायचे. बधाई हो हा सिनेमा मला योगायोगाने मिळाला. मला मिळाला नसता तर आज मी तिथेच राहिले असते. इंडस्ट्रीत जो दिखता है, वही बिकता है त्यामुळे इथे काही ना काही काम करत राहणे गरजेचे आहे.
आज सोशल मीडियाचा जमाना आहे, एखादी गोष्ट शेअर केली की लगेच व्हायरल होते. आमच्यावेळी असेही कोणतेही माध्यम नव्हते. मला आजही वाईट वाटते. जेव्हा मी आजच्या तरूण कलाकारांना बघते, तेव्हा मी वयाने अजून लहान असायला हवे होते. येथे अनेक प्लॅटफॉर्म आणि शक्यता आहेत. त्यामुळे मला खूप चांगले काम करणार्या तरुण मुलींचा हेवा वाटतो. माझ्या तरूणपणात मला हव्या तशा भुमिका मिळाल्या नाहीत. नेहमीच साईड हिरोइन म्हणूनच काम मिळत गेले आणि ते करत गेले. 'बधाई हो' सिनेमाने त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर मिळतात. अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' या सिनेमाही त्या काम करणार होत्या. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी भूमिका फार मोठी नसल्यामुळे सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या ५० व्या वर्षी नीना गुप्ता विवेक मेहरासोबत लग्नबंधनात अडकल्या आहेत. याविषयी बोलताना त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. 'आम्ही पहिल्यांदा दोघे विमानातच भेटलो. आम्ही दोघे लंडनला जात होतो.तो दिल्लीत राहत होता, परंतु काही कामामुळे तो मुंबईला आला होता. अचानक एका महिलेला तिची जागा बदलून हवी होती, तेव्हा विवेकने त्या महिलेला आपली जागा दिली आणि नंतर तो माझ्या शेजारी येऊन बसला.
नीना पुढे सांगितले 'तो नेहमीच मला चिडवायचा. की तूच आहेस, तू मला फसवलेस. आता मी गोष्टीवरून त्याच्याशी भांडत नाही. पूर्वी मी भांडायचे. आता मी उलट त्याला बोलते. बरं फसवले मी तुला, आता पुढे काय, माझ्याबरोबर खुश नसशील तर तू मला सोडून स्वतंत्र राहू शकतो. तुला कशाला अडकवून ठेवू. आता तो मस्करीतही मला तसे काही बोलत नाही.