बॉलिवूडमध्ये करिअर करताना अनेकांच्या वाट्याला संघर्ष येतो. या संघर्षाच्या कथा आपण ऐकल्याच असतील. अलीकडे एका दिग्गज अभिनेत्रीने तिची स्ट्रगल स्टोरी शेअर केली आणि सगळेच अवाक् झालेत. ही अभिनेत्री एक स्ट्राँग लेडी आणि सिंगल वूमन म्हणून ओळखली. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, ते एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल. त्याकाळात नीना यांनी लग्न न करता आई बनण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयाचे अनेक बरे-वाईट परिणाम त्यांना भोगावे लागले. इतक्या वर्षांनंतर नीना यावर खुलेपणाने बोलल्या.
अलीकडे मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक रहस्यांवरून पडदा उठवला. खासगी आयुष्यातील एक चूक सुधारण्याची संधी मला मिळालीच तर मी सर्वप्रथम लग्न न करता आई बनण्याची चूक सुधारेल, असे नीना म्हणाल्या. यामागचे कारणही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, प्रत्येक मुलाला आई-वडील दोघांच्याही प्रेमाची गरज असते. मी मसाबाशी (नीना यांची मुलगी) वेळोवळी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे शेअर केली. तिच्यापासून काहीही लपवले नाही. त्यामुळे माझ्या व तिच्या नात्यावर काहीही परिणाम झाला नाही. पण तिनेही खूप मोठा संघर्ष केला, हे मला माहित आहे.
नीना यांनी मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या एका बोल्ड निर्णयाने.
8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा.8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता.
आजही नीना तितक्याच बोल्ड आहेत. साठी ओलांडल्यानंतरही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यात आहेत. माज्या बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या.