नीना गुप्ता यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं. त्यांच्या खासगी जीवनाविषयी नेहमीच स्वतः वेगवेगळ्या गोष्टी सांगताना दिसतात. विवियन रिचर्ड्स यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि किंबहुना आहे. नीना गुप्ता यांचा हा जीवन प्रवास वर्णन करणारं पुस्तक 'सच कहुँ तो' मधून त्यांनी अनेक गोष्टींची उलगडा केला आहे.
या आत्मचरित्रात त्यांनी आई बनण्यापासून ते लग्नापर्यंतच्या प्रवासाची सगळी रहस्ये उघड केली आहेत. पुस्तकातून त्यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे जगासमोर आणले आहेत. यापैकी एक खुलासा ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टारसह स्क्रीन शेअर करणा-या नीना गुप्ता यांच्या जीवनातील हे रहस्य कुणालाच माहिती नव्हतं.
नीना गुप्ता यांचे क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्सबरोबर संबंध होते हे तर जगजाहीर आहे. त्यावेळी नीना गर्भवती राहिल्या होत्या. विव्हियनने नीनाशी लग्न केले नसले, तरी नीनाने लग्न न करता बाळाला या जगात आणण्याचे ठरवले होते. मुलीला जन्म दिला तिच मुलगी मसाबा आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध चेहरा बनली आहे. लग्न न करताच मुलीला जन्म दिल्यामुळे नीना गुप्ताचे कुटुंब त्यांच्यावर नाराज होते. तर विवियन रिचर्डसही त्यांच्या पत्नीपासून वेगळेच राहत होते.
मुलीच्या जन्मानंतर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता वेळ मिळताच मसाबासह एकत्र वेळ घालवायचे. आजही नीना गुप्ता विवियन रिचर्डस यांच्याबरोबर चांगले बॉन्डींग आहे. दोघांमध्येही खूप चांगले नाते होते म्हणून त्यांंना विवियन रिचर्डसोबत लग्न करण्याची गरज वाटली नसल्याचे म्हटले आहे. विवियन रिचर्डसच्या कुटुंबाला आमचा काही त्रास होणार नाही यासाठी आम्ही नेहमीच दूर राहिलो.
मसाबासह आम्ही दोघांनी घालवलेला वेळ कायमच स्मरणात राहिल. एक वेगळाच आनंद देणारा वेळ आम्ही तिघांनी एकत्र घालवला आहे. आयुष्यभरासाठी त्या आठवणी माझ्या कायम मनात राहतील. आता आम्ही जास्त भेटत नाही, पण आजही एकमेकांच्या संपर्कात असतो. म्हणूनच आयुष्यात कधीच विवियन रिचर्डसोबत लग्न करावे असे वाटले नाही. सिंगल मदर बनत एकटीनेच मुलगी मसाबाची काळजी घेतली. नंतर नीना यांनी 2008मध्ये विवेक मेहराशी लग्न केले आणि दोघांचा सुखाने संसार सुरु आहे.