Neena Gupta : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) ८०च्या दशकापासून सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. पण काही वर्षांपूर्वीच त्यांना चित्रपटांमध्ये चांगली संधी मिळू लागली. नुकत्याच एका मुलाखतीत, नीना गुप्ता यांनी वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने चर्चा केली. नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांच्यातील संबंध, लग्नाआधीच मुलीला जन्म देणं हे सगळं त्याकाळी किती कठीण होतं याचा खुलासा नीना गुप्ता यांनी केला आहे.
समाजाचे टोमणे ऐकून जगणं कठीण झालं
नीना गुप्ता यांनी अनुभव शेअर करताना सांगितले, 'मला चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले. मी आईपणाचा आनंद घेत होते. मात्र मला समाजाचे टोमणेही ऐकावे लागत होते. खूप जास्त आनंदासोबत तेवढंच दु:खही वाटयाला आलं होतं. मसाबामुळे मी खूप आनंदी होते. मात्र मीडिया आणि लोकांनी माझं जगणं कठीण केलं. म्हणून मी घरातच थांबायचे. मसाबाला बाहेर घेऊन जाता येत नव्हते. माझ्या डोळ्यासमोर पडदा टाकल्यासारखे मला वाटत होते. वाईट लोक नसतात हे मी स्वत:सा समजावत होते. बाहेरच्या देशाच कित्येक महिला लग्नाआधी प्रेग्नंट होतात. माझे निधन झाल्यानंतर मीडियामध्ये हेडलाईन होईल आपल्या अटीनुसार मर्जीप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या नीना गुप्ता यांचे निधन.'
1988 साली नीना गुप्ता यांनी मुलीला जन्म दिला. नीना आणि विवियन यांची ओळख जयपूर मध्ये झाली. नीना गरोदर राहिल्यानंतर दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा विवयन यांचे आधीच लग्न झाले होते. नीनासाठी ते घटस्फोट घेण्यास तयार नव्हते. त्यांनी हा निर्णय नीनावरच सोडला. नीना यांनी मुलीला जन्म दिला आणि एकटीनेच तिचा सांभाळही केला.
नीना यांनी समाजाचा विचार न करता एवढा धाडसी निर्णय घेतला. आज त्यांची मुलगी मसाबा प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. ती वडील विवियन यांच्याही संपर्कात असते. तर दुसरीकडे नीना यांनी २००८ मध्ये चार्टर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले.