Neena Gupta slams trolls : वयाची साठी ओलांडलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) म्हणजे बॉलिवूडच्या बिनधास्त अभिनेत्री. नीना सुरूवातीपासून अगदी स्वत:च्या अटींवर जगल्या. आजही त्या तसंच जगत आहेत. ज्या मुद्यावर अनेक कलाकार बोलायला घाबरतात, त्या मुद्यावर नीना अगदी बिनधास्त बोलतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. होय, महिलांना त्यांच्या कपड्यांवरून बोलणाऱ्यांना त्यांनी या व्हिडीओतून चांगलंच फटकारलं आहे.
‘ जे लोक सेक्सी कपडे परिधान करतात, जसे की मी परिधान केले आहेत ते लोक वायफळ, बेकार असतात, असा समज आहे. म्हणून मला हा व्हिडीओ शेअर करावा लागतोय. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी संस्कृतमध्ये एमफिल केलं घेतले आहे आणि इतरही खूप काही केलं आहे. त्यामुळे कपड्यांवरून कोणाला जज करू नका. ट्रोल करणाºयांनो लक्षात घ्या....,’ असं नीना या व्हिडीओत म्हणतात.
नीना यांनी ‘खानदान’या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. नीना गुप्ता आपल्या पर्सनल लाईफला घेऊन देखील तितक्याच चर्चेत राहिल्या. वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतला .
8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. वेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. खरं तर विवियन त्यावेळी विवाहित होता. पण ना नीना यांनी त्याची पर्वा केली, ना विवियनने. लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. सुरूवातीला त्यांच्या स्वत:च्या कुटुंबानेही त्यांना जवळ केलं नाही. नीना प्रेग्नंट असताना त्यांच्या आईचे निधन झालं. यानंतर मात्र नीनाच्या वडिलांनी मुलीला आधार दिला. ते दिल्लीहून मुंबईला मुलीसोबत राहायला आलेत.