Rishi Kapoor Dimple Kapadia Kissing Scene: ऋषि कपूर (Rishi Kapoor) आणि डिंपल कपाड़िया (Dimple Kapadia) या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये सोबत काम केलं. दोघांनी ‘बॉबी’ (Bobby) सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हा सिनेमा 1973 मध्ये आला होता.
या सिनेमाच्या शूटींग दरम्यान दोघे एकमेकांवर फिदाही झाले होते आणि दोघांना लग्नही करायचं होतं. पण होऊ शकलं नाही. दोघांची लव्हस्टोरी राज कपूर यांना पसंत नव्हती. त्यामुळे ऋषि यांनी डिंपलपासून वेगळं व्हावं लागलं. त्यानंतर ऋषि कपूर यांनी नीतू सिंहसोबत लग्न केलं. तर डिंपलचं लग्न राजेश खन्नासोबत झालं.
लग्नानंतर डिंपल दोन मुलींची आई झाली आणि काही काळ रूपेरी पडद्यापासून दूर गेली. 1985 मध्ये पुन्हा ऋषि आणि डिंपल सागर सिनेमाच्या माध्यमातून सोबत आले. या सिनेमात दोघांचा जबरदस्त रोमान्य बघायला मिळाला होता. यात एक किसींग सीनही होता.
ऋषि कपूर या गोष्टीमुळे नर्वस होते की, त्यांची पत्नी नीतू यावर कशी रिअॅक्ट करेल. ऋषि कपूर पत्नी नीतूला या सिनेमाच्या प्रीमियरला घेऊन गेले होते. जेव्हा दोघे सिनेमा बघून बाहेर आले तेव्हा त्यांनी पत्नीला सिनेमा कसा वाटला म्हणून विचारलं. यावर नीतू म्हणाली की, सिनेमा चांगला होता, पण तू किसींग सीन चांगल्या प्रकारे नाही केला.
ऋषि नीतूचं बोलणं ऐकून हैराण झाले होते आणि ते रिलॅक्सही झाले की, त्यांच्या पत्नीने किसींग सीन पाहून ओवर रिअॅक्ट केलं नाही. दरम्यान 2020 मध्ये ऋषि कपूर यांचं कॅन्सरने निधन झालं होतं. तेच डिंपल अजूनही सिनेमे करत आहे. ती नुकतीच शाहरूख खानच्या पठाणमध्ये दिसली होती. तर नीतूही शोज आणि सिनेमात दिसते.