गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व आलिया भट ( Alia Bhatt ) लग्नबंधनात (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding) अडकले. शेवटपर्यंत या लग्नाबद्दल इतकी गुप्तता पाळली गेली की याबद्दल कुणालाही काहीही माहित नव्हतं. अगदी लग्न 13 ते 17 एप्रिलदरम्यान होईल, एवढंच काय मीडियात लीक झालं होतं. लग्नाच्या दिवशीही आज लग्न आहे, हे कपूर व भट फॅमिलीनी कुणाला कळू दिलं नव्हतं. मुळात या लग्नाबद्दल इतकी गुप्तता का पाळली गेली? हे इतक्या दिवसांनंतर समोर आलं आहे. खुद्द नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत नीतू लेकाच्या लग्नाबद्दल बोलल्या.
आम्हाला कुणालाच सांगायचं नव्हतं कारण...माझं व ऋषीजींचं लग्न झालं, तसं रणबीर व आलियाचं लग्न आम्हाला नको होतं. आम्हाला लग्नाची सर्कस बनवायची नव्हती. लग्नाआधी जी सर्कस होते, तीच नको होती. ते मीम्स, वेगवेगळ्य गोष्टी यामुळे मेंदूची नस फाटते. त्यामुळे आम्ही अतिशय शांत पद्धतीने लग्न करायचं ठरवलं होतं. अगदी यासाठी आम्ही शॉपिंगही केलं नाही. काही लोकांना काही जबाबदा-या आम्ही वाटून दिल्या होत्या. कारण आम्ही स्वत: गेलो असतो तर सगळ्यांना कळलं असतं. अर्थात नंतर लोकांना कळलंच. पण ते आमच्या हातात नव्हतं. घरावर लाइटींग लागल्यावर सगळ्यांना कळायचं ते कळणार होतंच, असं नीतू म्हणाल्या.
आलिया व रणबीरनं खूप प्लॅनिंग केलं होतं पण...लग्नासाठी रणबीर व आलियानं खूप प्लॅनिंग केलं होतं. अगदी साऊथ आफ्रिकेत जाऊ, इथे जाऊ, तिथे जाऊ.. हे करू, ते करू. पण लग्न कुठे झालं तर घराच्या छतावर. दोघंही दोन वर्षांपासून ठरवत होते पण तसं काहीही झालं नाही. अर्थात जे झालं ते अगदी परफेक्ट होतं. आलिया लग्नात खूपच सुंदर दिसत होती, असं नीतू कपूर म्हणाल्या.
आम्ही मोजून 40 लोकांना बोलावलं होतं...लग्न खूप सुंदर झालं. सगळ्यांनी लग्नात खूप धम्माल केली. लग्नात 10 हजार लोक आल्यावर ते फक्त टीका करतात. जेवण असं होतं, डेकोरेशन असं होतं वगैरे वगैरे त्रुटी काढत राहतात. मग त्यांना का बोलवायचं? माझे पती जिवंत असल तर कदाचित त्यांनी रणबीर व आलियाचं लग्न धूमधडाक्यात केलं असतं. कारण ते शो मॅन होतं. पण रणबीरनं त्यांनाही प्रायव्हेट सेरेमनीसाठी राजी केलं असतं. कारण रणबीर व आलिया दोघंही प्रायव्हेट पर्सन आहेत. त्यांना हा- हीं आवडत नाही. आम्ही लग्नात केवळ 40 लोकांना बोलावलं होतं. पार्टीतही 40 लोक होतं. मेहंदी सेरेमनीतही 20 माझ्याकडून आणि 7-8 आलियाच्या मैत्रिणी होत्या, असं नीतू यांनी सांगितलं.
मजेशीर होती वरात...रणबीर व आलियाची लग्नाची वरात 5 व्या माळ्यावरून 7 व्या माळ्यावर गेली. ती आत्तापर्यंतची सगळ्यांत भारी वरात होती. पॅसेजमध्ये ते भांगडा करत होते. मला वरातीत घोडी हवी होती. पण मग लोकांना कळलं असतं. मग मीच ‘भूल जाओ घोडी’ म्हटलं आणि आमची वरात 5 व्या माळ्यावरून 7 व्या माळ्यावर गेली..., असं नीतू यांनी सांगितलं.