Join us

अंगद बेदीला आठवतोय त्याचा पहला पहला प्यार, तिच्याविषयी म्हणाला........

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 10:39 AM

एका मुलाखतीत अंगद त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलला.त्याने म्हटले की, नोरा खूप चांगली मुलगी आहे.

अभिनेता अंगद बेदीनेनेहा धुपियासह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली. या दोघांना एक गोंडस मुलगी देखील आहे. सगळं काही सुरळीत सुरू असताना अंगद मात्र त्याच्या पहिल्या प्रेमाला विसरलेला नाही असेच दिसतंय. नेहाच्या प्रेमात पडण्याआधी अंगद अभिनेत्री नोरा फतेहीच्या प्रेमात होता. काही कारणामुळे त्यांचे बिनसले आणि ते वेगळे झाले. एका मुलाखतीत अंगद त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलला.त्याने म्हटले की, नोरा खूप चांगली मुलगी आहे. 

तिच्या लाइफमध्ये खूप चांगलं करत आहे. तिला प्रेक्षक पसंत करत आहेत. ती तिच्या कामात ती स्टार आहे. ती तिच्या करिअरमध्ये पुढे जात आहे. शिवाय आमच्या नात्यामध्ये जे काही घडले त्याविषयी जास्त विचार न केलेलाच बरा. कारण  प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते, काही नाती दिर्घकाळ टिकतात, तर काही नाही टिकत प्रत्येकाला त्याचं नातं दिर्घकाळ टिकावं असं वाटत असतं आणि तो त्यासाठी प्रयत्न सुद्धा करतो. असं करुन ते नातं टिकलं तर ठिक नाहीतर मग त्यानंतर आपल्याला मनस्ताप सहन करण्यापलिकडे काहीच मिळत नाही. त्याच्या या वक्तव्यावरून तर अंगद नोराच्या प्रेमात आकंत बुडाला होता.

मात्र त्या दोघांच्या नशीबात काही औरच होते. म्हणून नोरा आणि अंगद यांचे नाते फार काळ काही टिकू शकले नाही. गेल्यावर्षी १० मे रोजी नेहाने अंगद बेदीशी लग्न केले होते. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंसीची गोष्ट तिने लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. अंगद व नेहाने इतके महिने प्रेग्नंसी का लपवली, हे कळायला मार्ग नव्हता. पण एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वत: यामागचे कारण सांगितले होते. नेहा धुपिया बाळाच्या जन्मानंतर तिचे मदरहुड एन्जॉय करत आहे. तिच्या प्रत्येक घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला तिने मेहरला जन्म दिला होता. 

टॅग्स :अंगद बेदीनोरा फतेहीनेहा धुपिया