बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा आपल्या उत्तराने सोशल मीडियावर ट्रोलर्सची बोलती बंद करणारी नेहा सध्या अशाच एका कारणाने चर्चेत आहे. पुन्हा एकदा एका ट्रोलरला तिने असे काही सुनावले की, त्याची बोलती बंद झाली.आता हे काय प्रकरण ते जाणून घेऊ. तर आई बनल्यानंतर नेहाने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती मुलीला स्तनपान करताना दिसली होती. तिच्या या फोटोवर एका युजरने अशी काही कमेंट केली की, नेहाला राहावले नाही. मग काय, तिने या ट्रोलरची चांगलीच शाळा घेतली.‘तू तुझा ब्रेस्टफीड करतानाचा व्हिडिओ पोस्ट करू शकतेस का? नम्र विनंती!!!’, असे या युजरने लिहिले. ही कमेंट वाचून नेहा भडकली. तिने या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत, संबंधित युजरला फैलावर घेतले. (Neha Dhupia replied to troller who asked to post breastfeeding video)
‘मी नेहमी अशा अनेक कमेंटना टाळते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. पण हे जगासमोर आणणे आवश्यक होते. कारण यांच्यासारख्या व्यक्तींमुळे संपूर्ण स्त्रीजातीसाठी आपल्याच मुलांना अंगावरचे दूध पाजणे ही लाजिरवाणी गोष्ट बनते,’ असे नेहाने लिहिले.