Join us

नेहा धुपिया होती लग्ना आधीच प्रेग्नेंट, यावर कुटुंबीयांची होती अशी रिअ‍ॅक्शन; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 18:44 IST

नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती. यावर तिच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती याचा तिने खुलासा केला आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia)ला वेगळ्या ओळखीची गरज नाही. चित्रपटांपासून ते रिअ‍ॅलिटी शोपर्यंत नेहा तिच्या दमदार स्टाईलसाठी ओळखली जाते. 2018 मध्ये नेहा धुपियाने बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केले. पण नेहा धुपिया लग्नाच्या काही महिन्यांनंतरच आई झाली. नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती. यावर तिच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती याचा तिने खुलासा केला आहे. 

नेहाने केला खुलासा नेहा धुपिया लग्नाआधी प्रेग्रेंट होती. अलीकडेच नेहा धुपियाने टाईम्स नाऊ डिजिटलशी या यावर भाष्य केलं आहे. यादरम्यान नेहा धुपियाने सांगितले की, लग्नापूर्वी प्रेग्नेंट असल्याची बातमी ऐकून माझ्या घरच्यांची प्रतिक्रिया  आश्चर्यकारक होती. अंगदशी लग्न करण्यासाठी माझ्या वडिलांनी मला फक्त दोन-तीन दिवसांचा अवधी दिला होता आणि मला 72 तासांत लग्न करावे लागेल, असे सांगितले होते. त्यामुळे आम्हाला थाटामाटात लग्नं करता आलं नाही.

इतक्या कमी वेळात मी पटकन मुंबईत आलो, थोडी फार तयारी केली आणि मग अंगदसोबत लग्न केले. नेहा धुपियाने लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया सांगितली आहे. 2018 मध्ये नेहा धुपियाने मुलगी मेहरला जन्म दिल्याची माहिती आहे.

बॉलीवूड बबलच्या रिपोर्टनुसार, नेहा धुपियाने माहिती दिली होती की, लग्नापूर्वी तिने अंगद बेदीची आई मनपिंदर   बबली धुपिया यांची ओळख करून दिली होती, तेव्हा त्यांना अंगद खूप आवडला होता.  

टॅग्स :नेहा धुपिया