सोशल मीडियावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सेलिब्रेटी ट्रोल होत असतात. अनेक वेळा सेलिब्रेटींच्याफॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते. आता गायिका नेहा कक्कडही तिच्या हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कड हिमांश कोहलीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत. या ब्रेकअपनंतर नेहाने सोशल मीडियावरचे त्याच्यासोबतचे सगळे फोटो डिलीट केले होते. या बे्रेकअपनंतर नेहा डिप्रेशनमध्ये गेली होती. खुद्द तिनेचं सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने हिमांशसोबतच्या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते. मी वेळ देत नाही, अशी त्याची तक्रार होती. मी त्याच्यासाठी माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. माझा सगळा वेळ, माझी ऊर्जा त्याच्यावर खर्च केली. पण तो त्या योग्यतेचा नव्हताच, असे ती म्हणाली होती.आता नेहाच्या या लूकला खुप ट्रोल केले जात आहे.इतकेच नाही तर एका नेटीझन्सने तिला ड्रेसिंग सेन्सच नसल्याचे म्हटले आहे.नेहाचा फॅशन एक्सपेरिमेंट फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नेहालाया गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचे तिने म्हटले आहे.
नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. याच शोच्या दुसऱ्या सीजन पासून केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये गेली होती. या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिल रिजेक्ट करण्यात आलं होतं. तरीही ती खचली नाही. मोठ्या मेहनतीने तिने स्वतःची यशस्वी गायिका अशी ओळख निर्माण केली. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये ती मानधन घेते.