बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणारी सिंगर नेहा कक्कड सध्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नेहाचे अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले. नेहा व हिमांश गत ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या चार वर्षांत नेहा हिमांशमध्ये इतकी गुंतली होती की, आता ब्रेकअपनंतर तिला स्वत:ला सांभाळणे कठीण जातेय. अलीकडे ‘इंडियन आयडॉल 10’च्या सेटवर एका स्पर्धकाचे गाणे ऐकून नेहा इतकी इमोशनल झाली की, चक्क रडू लागली. तिला तिच्या भावना रोखता आल्या नाहीत. यानंतर नेहाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिून आपले दु:ख बोलून दाखवले. पण हळूहळू नेहा या सगळ्यातून बाहेर पडू इच्छिते. कदाचित त्यामुळे हिमांश कोण, असा प्रश्न स्वत: नेहाचं विचारू लागली आहे. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.
नुकतेच एका वेबपोर्टलने नेहाला हिमांशबद्दल विचारले. हिमांशचे नाव ऐकताच नेहाने त्याला ओळखण्यास नकार दिला. ‘कौन हिमांश...मैं इस नाम के किसी भी शख्स को नहीं जानती हूं,’ असे नेहा म्हणाली. कृपया मला एकटे सोडा, अशी विनंतीही नेहाने केली.
नेहाच्या या उत्तरावरून ब्रेकअपमधून सावरणे, नेहासाठी सोपे नाही, असे दिसतेय. नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’केले आहे. केवळ इतकेच नाही तर नेहाने हिमांशसोबतचे स्वत:चे सर्व व्हिडिओ व फोटो आपल्या सोशल अकाऊंटवरून डिलिट केले आहेत. नेहा व हिमांश दोघेही ‘ओह हमसफर’ या व्हिडिओत एकत्र दिसले होते.
‘इंडियन आयडॉल 10’मध्ये ‘शादी स्पेशल’ भागात या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी नेहाला आश्चयार्चा सुखद धक्का देण्यासाठी हिमांशला आमंत्रित केले होते. आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता आणि ती वेड्यासारखी हसत होती.माझ्यासाठी हिमांश फक्त मित्र नाही तर त्यापेक्षा जास्त आहे. जगात हिमांश इतक्या चांगल्याप्रकारे तिला अन्य कोणी समजून घेत नाही आणि ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे.हिमांश इतक्या चांगल्या प्रकारे मला कोणीच ओळखत नाही. मी फक्त त्याच्याशीच लग्न करण्याचा विचार करू शकते. मी त्याच्या चित्रपटासाठी ‘आज ब्लू है पानी पानी’ हे गीत म्हटले होते, त्यावेळी मी हिमांशला सर्वप्रथम भेटले होते. त्या दिवसापासून आमचा झालेला हा प्रवास खूप सुंदर होता, ज्याच्या अनेक गोड आठवणी आहेत, असे नेहा यावेळी म्हणाली होती.