Join us

ना प्रियांका, ना कंगना... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये एन्ट्री? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:46 IST

'क्रिश 4' मध्ये कोणती अभिनेत्री हृतिक रोशनसोबत दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Krrish 4 : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) याने ‘सुपरहीरो’ बनून सर्वांचे मन जिंकले आहे. त्याची ‘क्रिश’ सीरीजच्या चाहत्यांना खूपच आवडली होती. या चित्रपटाचे 3 भाग आले आहेत, आता त्याच्या चौथा भाग  'क्रिश 4'ची (Krrish 4) च्या रिलीजबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. 'क्रिश 4' ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक फारच आतुर झाले आहे. सिनेमाची कथा काय असणार, कोणती अभिनेत्री हृतिक रोशनसोबत दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

क्रिश 4 गेल्या 11 वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. 'क्रिश 4'मध्ये गेल्या तिन भागांप्रमाणेच चौथ्या भागातही हृतिक रोशन हाच सुपरहिरो असेल, पण हिरोईन कोण असेल? यावर काहीसा सस्पेन्स आहे. पण आता एका अभिनेत्रीच्या नावावर जवळपास शिक्कामोर्बत झालं आहे. ती अभिनेत्री मराठमोळी श्रद्धा कपूर (Krish 4 Shraddha kapoor Entry) ही असणार आहे. खुद्द श्रद्धा कपूरने याबद्दल हिंट दिली आहे. 

श्रद्धानं एका मुलाखतमीमध्ये बोलताना सांगितलं की, जानेवारीत तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा होणार आहे. तो सिनेमा 'क्रिश 4' असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. कारण, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की ते जानेवारी 2025 मध्ये 'क्रिश 4' ची घोषणा करणार आहेत. तसेच श्रद्धा कपूरला चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ऑफिसबाहेरही स्पॉट करण्यात आलं आहे. अभिनेत्री किंवा निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Shraddha will announce her new movie in January. It's most probably Krrish 4 byu/divaista inBollyBlindsNGossip

2003 साली 'कोई मिल गया' हा चित्रपट आला होता. ज्यात प्रीती झिंटाने हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर 'कोई मिल गया'चा सिक्वल 'क्रिश' 2006 मध्ये आला. यात प्रियांका चोप्रा झळकली होती. 7 वर्षांनंतर 'क्रिश 3' आला आणि त्यात प्रियंकासोबत कंगना राणौत आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होते.  

टॅग्स :श्रद्धा कपूरप्रियंका चोप्राकंगना राणौतहृतिक रोशन