Join us

ना रवीना टंडन अन् नाही प्रियंका चोप्रा, सर्वात आधी या अभिनेत्रीसोबत अक्षय कुमारचं होतं अफेयर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:57 IST

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या लग्नाला २४ वर्षे झाली आहेत. जानेवारी २००१ मध्ये अक्षयने राजेश खन्ना यांची मुलगी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. पण लग्नाआधी आणि नंतरही अक्षयच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

अक्षय कुमार(Akshay Kumar)च्या लग्नाला २४ वर्षे झाली आहेत. जानेवारी २००१ मध्ये अक्षयने राजेश खन्ना यांची मुलगी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना(Twinkle Khanna)सोबत लग्न केले. पण लग्नाआधी आणि नंतरही अक्षयच्या अफेअरच्या चर्चा होत्या. लग्नापूर्वी अक्षयचे नाव रवीना टंडन आणि रेखा यांच्यासोबत जोडले गेले होते. लग्नानंतर प्रियांका चोप्रासोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चा होत्या. मात्र अक्षयचे आणखी एका अभिनेत्रीसोबत अफेअर होते. याचा खुलासा अभिनेत्री शीबा आकाशदीपने केला आहे. ती म्हणाली की, ''ती आणि अक्षय एकमेकांना डेट करत होते.''

शीबा आकाशदीपने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, १९९२ मध्ये 'मिस्टर बॉन्ड' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती अक्षय कुमारला भेटली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये समान भावना होत्या, तरीही हे नाते लवकरच तुटले. शीबाने अक्षय आणि तिच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल माहिती दिली. शीबा आकाशदीप म्हणाली, ''जेव्हा तुम्ही तरुण असता आणि एकमेकांसोबत काम करता तेव्हा प्रेम होते. दोघेही फिटनेसचे चाहते होते आणि कौटुंबिक मित्रही. माझी आजी आणि त्याची आई एकत्र पत्ते खेळायच्या.'' तिच्या आणि अक्षयच्या ब्रेकअपच्या कारणाबाबत शीबा म्हणाली, ''आम्ही दोघेही लहान होतो. मी याबद्दल बोलतही नाही. मला ते खूप मजेशीर वाटते.''

शीबा आकाशदीप म्हणाली, ''यावर बोलायची काय गरज आहे? मला तो काळ फारसा आठवतही नाही. त्याला तीन दशकांहून अधिक काळ लोटला आहे.'' ब्रेकअपनंतर शीबा आणि अक्षयने मित्र न राहण्याचा निर्णय घेतला. शीबा म्हणाली, ''जेव्हा तुम्ही खूप लहान असता, खूप भावनिक असता तेव्हा असे होत नाही. तुम्ही इतके भावनिक होतात की त्यानंतर तुम्ही जास्त काळ सामान्य राहू शकत नाही.'' ती पुढे म्हणाली, ''लहान वयातील प्रेम हे खूप भावनिक आणि शक्तिशाली असते आणि ते एखाद्या स्फोटासारखे असते. तेव्हा तो स्फोट झाला की संपवावा लागते… मैत्री टिकू शकत नाही. नंतर मैत्री होण्यासाठी नात्यात बरीच गुंतवणूक केली जाते. तुम्ही खरोखर प्रौढ झाल्याशिवाय हे घडत नाही."

टॅग्स :अक्षय कुमाररवीना टंडनप्रियंका चोप्रारेखा