Join us

Sacred Games2 : पंकज त्रिपाठींना कशी मिळाली गुरुजींची भूमिका? ऑडिशन व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 4:00 PM

हा मजेशीर व्हिडीओ ‘लीक्ड ऑडिशन  टेप्स’ नावाने रिलीज करण्यात आला आहे. या प्रमोशनल व्हिडीओला आत्तापर्यंत 10 लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत.

ठळक मुद्देविक्रम चंद्राची कादंबरी ‘सेक्रेड गेम्स’वर आधारित या सीरिजच्या दुस-या सीझनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी मिळून केले आहे.

‘सेक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचे दुसरे सीझन रिलीज झाले. पहिल्या सीझनप्रमाणे ‘सेक्रेड गेम्स 2’वरही चाहत्यांच्या उड्या पडल्या. या नव्या सीझनमध्ये अनेक नव्या चेहºयांची एन्ट्री झालीय. अभिनेत्री कल्की कोच्लिन बत्याच्या तर अभिनेते पंकज त्रिपाठी गुरुजींच्या भूमिकेत आहेत. गुरुजी अर्थात पंकज त्रिपाठींचे पात्र चांगलेच इंस्टरेस्टिंग आहे. ही भूमिका पंकज यांना कशी मिळाली, याचा खुलासा आता झालाय. खुद्द नेटफ्लिक्सने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.युट्यूबवर नेटफ्लिक्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंकज त्रिपाठी ‘सेक्रेड गेम्स 2’साठी ऑडिशन देत असताना दिसत आहेत. आधी ते नवाजुद्दीनने साकारलेल्या गणेश गायतोंडेचे डायलॉग म्हणतात. यानंतर बंटीचे डायलॉग म्हणतात. पण हे डायलॉग थोडे अश्लिल असल्याने या दोन्ही पात्रांसाठी पंकज त्रिपाठी नकार देतात. यानंतर त्यांना गुरुजीचे डायलॉग दिले जातात आणि पंकज यांनी या भूमिकेसाठी होकार दिला.

विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्येही ते पास होतात. हा मजेशीर व्हिडीओ ‘लीक्ड ऑडिशन  टेप्स’ नावाने रिलीज करण्यात आला आहे. या प्रमोशनल व्हिडीओला आत्तापर्यंत 10 लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत.

‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये पंकज त्रिपाठी यांनी गुरुजींची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. विक्रम चंद्राची कादंबरी ‘सेक्रेड गेम्स’वर आधारित या सीरिजच्या दुस-या सीझनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी मिळून केले आहे. पहिल्या सीझनमध्ये आपण गणेश गायतोंडेच्या नजरेतून मुंबई शहर पाहिले आणि त्यासोबतच गणेश गायतोंडे कसा मोठा झाला हेही पाहिलें.  दुसरा सीझन हा गणेश गायतोंडेच्या पतनावर आहे. तेच दुसरीकडे चांगला मित्र असलेल्या हवालदार काटेकरच्या मृत्युने दु:खी सरताज सिंगचे जगणेही दाखवले आहे. तो अजूनही गायतोंडेच्या मिस्ट्रीमध्ये अडकलेला आहे. 

टॅग्स :सॅक्रेड गेम्सपंकज त्रिपाठी