Join us  

"हुबेहुब वडिलांसारखा दिसतोय", इब्राहिमचा 'तो' व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आली सैफची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 4:46 PM

सैफचा लेक इब्राहिमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील त्याच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इब्राहिमचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना सैफ अली खानची आठवण झाली आहे. 

सैफ अली खान हे बॉलिवूडविश्वातील लोकप्रिय नाव आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच सैफची लेक सारा खान आणि मुलगा इब्राहिम अभिनयात त्यांचं नशीब आजमावत आहेत. सध्या सैफचा लेक इब्राहिमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील त्याच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इब्राहिमचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना सैफ अली खानची आठवण झाली आहे. 

इब्राहिम खानने नुकतीच किल सिनेमाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. स्क्रिनिंगदरम्यान इब्राहिमने पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. याचा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत इब्राहिम जीन्स, शर्ट आणि ब्लेझरमध्ये दिसत आहे. त्याचा डॅशिंग अंदाज या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. इब्राहिमच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी त्याची तुलना सैफ अली खानशी केली आहे. 

"सैफची कार्बन कॉपी", "हा सेम त्याच्या वडिलांसारखा दिसतो", "वडिलांची कॉपी आहे", "सैफचा क्लोन आहे", अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. इब्राहिम आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये आहे. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. 

दरम्यान, इब्राहिम हा सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा आहे. सैफने १९९१ साली वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी लग्न करत संसार थाटला होता. त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. सुखी संसाराच्या १४ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर सैफने २०१२मध्ये करीना कपूरशी लग्न केलं. करीना आणि सैफला तैमुर आणि जेह ही दोन मुले आहेत. 

टॅग्स :इब्राहिम अली खानसैफ अली खान सेलिब्रिटी