एक काळ असा होता जेव्हा श्रीदेवीने नागिनची भूमिका करून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली होती. आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर नागिन पाहायला मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)ने तिच्या आगामी 'नागिन' (Nagin Movie) चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची बातमी समोर येत आहे. काही काळापूर्वी चित्रपट निर्माते निखिल द्विवेदीने (Nikhil Dwivedi) नागिनच्या सेटवरील एक फोटो शेअर करून ही माहिती दिली होती.
निर्माते निखिल द्विवेदीने 'नागिन'च्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. ज्यात नागिनची स्क्रीप्ट पाहायला मिळत आहे आणि पूजा केलेली दिसत आहे. या स्क्रीप्टवर नागिन ॲन एपिक टेल ऑफ लव्ह अँड सॅक्रिफाइस... असे लिहिलेले दिसत आहे. निखिल द्विवेदीच्या या अपडेटनंतर सोशल मीडियावरील युजर्स उत्सुक झाले आहेत.
नागिनच्या सेटवरील फोटो पाहिल्यानंतर श्रद्धा कपूरच्या चित्रपटाबद्दल बोलत आहेत. नागिन चित्रपटात श्रद्धा कपूरचा लूक कसा असेल यावर लोक अंदाज लावत आहेत, तर काही लोक असे आहेत की ज्यांनी श्रद्धा कपूरची तुलना टीव्हीच्या नागिन मौनी रॉयशी करायला सुरुवात केली आहे. नेटकरी म्हणतात की मौनी रॉयपेक्षा चांगली नागिन कोणीच असू शकत नाही. मौनी रॉयनेच नागिन बनून एक नवीन ट्रेंड सेट केला. चाहते निखिल द्विवेदीला सल्ला देत आहेत की त्याने श्रद्धा कपूरऐवजी मौनी रॉयला नागिनच्या भूमिकेसाठी घेतले पाहिजे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर श्रद्धा कपूरने नागिनचे शूटिंग सुरू करून खूप चांगले काम केले आहे, असे काही चाहते म्हणत आहेत.
श्रद्धाने शूटिंगला केली सुरुवातगेल्या ३ वर्षांपासून नागिनच्या स्क्रिप्टवर काम सुरू होते. आता श्रद्धा कपूरने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आता चाहते नागिन पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.