Nana Patekar-Virat Kohli : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) पाचवा कसोटी सामना सुरू आहे. ही मॅच जिंकणं भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी कोलमडल्याचे पाहायला मिळालं. लक्षवेधी बाब म्हणजे या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) बाद झाला आहे. 17धावांनंतरच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याची विकेट घेतली. विराट बाद झाला असला तरी सोशल मीडियावर चर्चा मात्र ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांची रंगली आहे. तर यामागे नेमकं कारण काय आहे, हे जाणून घेऊया.
नाना पाटेकर आणि विराट कोहलीचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज विराटमुळे पाटेकर यांना उपाशी राहावं लागेल, अशी चर्चा रंगली आहे. कारण एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकर म्हणाले होते, "विराट कोहली हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. तो लवकर बाद झाल्यावर मला जेवण घशाखाली जात नाही. जेवण्याची इच्छाच राहत नाही". आता विराटच्या बाद झाल्यामुळे नाना पाटेकर काही जेवणार नाहीत, असे नेटकरी म्हणाताना पाहायला मिळत आहेत.
चला तर मग पाहूया विराट कोहली आणि नाना पाटेकर यांच्यावरील व्हायरल होत असलेले काही गंमतीशीर मीम्स.