बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ या माध्यमातून शेअर करत असते. तसेच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहतेदेखील शेअर करत असते. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे करीनाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकताच तिच्या फॅन पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे आणि या व्हिडीओतील तिची वर्तणूक पाहून लोकांनी तिला ट्रोल केले आहे.
या व्हायरल व्हिडीओत करीना कपूर तिच्या घरातून बाहेर पडून गाडीत बसताना दिसते आहे. तिच्या हातात एक कॉफी मग होता. यावेळी करीनाने बेज रंगाची शॉर्ट टाइट्स आणि लॉंग डेनिम शर्ट परिधान केले आहे. केसांचा बन बांधलेला दिसतो आहे आणि तिने गॉगलही लावला आहे. कारकडे जात असताना तिला गार्डने सॅल्यूट केले तर तिने पूर्णपणे तिला इग्नोर केले. या व्हिडीओतील करीनाचा हा व्यवहार पाहिल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल केले.
करीना कपूरला ट्रोलर्सने गर्विष्ठ म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, करीनाला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे की गार्डने तिला सलाम केला आणि तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व गाडीत जाऊन बसले. दुसऱ्या एका युजरने इंग्रजांसारखी वर्तणूक म्हटले. आणखी एका युजरने लिहिले की, तिने तिच्या कर्मचाऱ्याच्या सलामीवर रिएक्शन का दिली नाही. तर दुसऱ्याने लिहिले की, मनी अॅटिट्युडवाली आँटी.
आणखी युजरने लिहिले की, हिला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे. हवेकडे पाहून चालते आहे. नाकावर मातीदेखील बसू देत नाही. एका युजरने लिहिले की, हिचा अॅटिट्युड तर पहा. तिच्याकडे रिस्पॉन्ड करायला देखील वेळ नाही. यावरून समजते आहे की हिचे मन किती बेकार आहे. काही लोकांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे.