अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत येतो आहे. आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे की सोनू सूद प्रवासी मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. मुंबईतून दरभंगा येथे पोहचलेल्या प्रवासी गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला, त्यानंतर तिने तिला घरी सुखरुप पोहचवणाऱ्या सोनू सूदचे नाव बाळाला देण्याचा निर्णय घेतला.लॉकडाउनमध्ये अडकलेल्या प्रवासी मजूरांना केलेल्या मदतीमुळे सोनू सूद चर्चेत आला आहे. मजूरांना मुंबईतून त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत करणारा सोनू सूद त्यांच्यासाठी देवदूत बनला आहे. त्यामुळे कोणी त्याला पद्मभूषण देण्याची मागणी करत आहे तर कुणी त्याला सुपरहिरो समजत आहे. कठीण काळात दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या सोनू सूदसोबत एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली आहे.
सोनूने सांगितले की, 12 मे रोजी प्रवासी मजूरांचा ग्रुप त्याने दरभंगाला पाठवले होते. त्यात दोन गर्भवती महिलादेखील होत्या. घरी पोहचल्यानंतर त्यातील एका महिलेने बाळाला जन्म दिला. तिच्या कुटुंबाने फोन करून सांगितले की नवजात बालकाचे नाव सोनू सूद ठेवले आहे. ही गोष्ट सोनू सूदला खूप भावली आहे.सोनू सूद पुढे म्हणाला की, त्याला भारतातून जवळपास 56 हजार मेसेज आले आहेत. लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे, हे पाहून तो खूप खूश आहे. तसेच त्याची कामगिरी पाहून महाराष्ट्राचे राज्यपालदेखील प्रभावित झाले. बुधवारी भगत सिंग कोश्यारी यांनी फोन करून त्याचे कौतूक केले.