Join us

अंधाच्या भूमिकेने दिली नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:06 AM

साऊथची अभिनेत्री काजल अग्रवाल एका नव्या हिंदी चित्रपटात येत आहे. दो लब्जों की दास्तां असे या चित्रपटाचे नाव असून ...

साऊथची अभिनेत्री काजल अग्रवाल एका नव्या हिंदी चित्रपटात येत आहे. दो लब्जों की दास्तां असे या चित्रपटाचे नाव असून यात ती एका अंध युवतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी काजल खूप उत्साहित आहे. याचे कारणही तसेच आहे.अंधाची भूमिका साकारणे हे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. आणि म्हणूनच अशा भूमिकांचे कौतुकही झाले आहे. या भूमिकांनी अनेक स्टार्सना नवी ओळखसुद्धा दिली आहे. दीपिका पदुकोणने काही काळापूर्वी यशराज यांचा चित्रपट लफंगे परिंदेमध्ये अंध युवतीची भूमिका केली होती. दीपिका याला आपल्या करिअरची महत्त्वपूर्ण भूमिका समजते. यशराजयांच्या फना चित्रपटात काजोलनहेही अंध युवतीची भूमिका साकारली होती. आतंकवादावर आधारित या चित्रपटात काजोलसोबत आमिर खान होता आणि हा चित्रपट हिटही झाला होता. अमिषा पटेलने हमको तुमसे प्यार है या चित्रपटात या प्रकारची भूमिका केली आहे.बालिवूडच्या नायकांबद्दल सांगायचे तर तनुजा चंद्राच्या चित्रपटात संजय दत्तने एका अंध सैनिकाची भूमिका केली होती. यात काजोल त्याची जोडीदार होती. बँकड्रॉपवर आधारित विपुल शाह यांचा थ्रिलर चित्रपट आंखेंमध्ये अक्षय कुमार, अर्जुन रामपाल आणि परेश रावल अंध बनतात. आणि एक बँक लुटतात. इंद्र कुमार यांचा चित्रपट प्यारे मोहनमध्ये फरदीनची भूमिका अंध युवकाची होती. त्याच्यासोबत विवेक ओबेराय होता. जो मुक्याच्या भूमिकेत होता. बॉक्स आफिसवर हा चित्रपट फ्लॉप राहिला.ट्रेजडी किंग दिलीप कुमार यांनी १९५१ मध्ये आलेल्या दीदार चित्रपटात पहिल्यांदा एका अंध गायकाची भूमिका केली होती. नरगिस, अशोक कुमार आणि निम्मी या चित्रपटाचे दुसरे कलाकार होते. यानंतर १९७१ मध्ये आलेल्या बैरागमध्ये पुन्हा एकदा दिलीप कुमार यांनी अशा प्रकारची भूमिका केली. या चित्रपटात त्यांचा ट्रिपल रोल होता. १९८६ मधील सस्पेंस थ्रिलर चित्रपट कातीलमध्ये संजीव कुमार यांनी एका अंधव्यक्तिची भूमिका केली होती. ही यादी एका नावाने अपूर्ण आहे. ते म्हणजे नसरुद्दीन शाह यांचे.नसीर यांनी एक नाही दोन वेग वेगळ्या चित्रपटात अंधांची भूमिका केली आहे. पहिले ते स्पर्श चित्रपटात या प्रकारच्या भूमिकेत आले. चित्रपटात नसीर यांचा अभिनय इतका र्ममस्पश्री होता की ही आजपर्यंतच्या अंधावर आधारित सवरेत्तम भूमिका मानली जाते. काही वर्षांनंतर नसीर यांनी राजीव राय यांचा चित्रपट मोहरामध्ये पुन्हा एकदा अंधाची भूमिका केली. हीसुद्धा खूप गाजली.