Join us

'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरीचा जुना व्हिडिओ व्हायरल, तिच्या क्युटनेसवर कमेंट्स सेक्शन 'फुल'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 9:52 AM

तृप्ती डिमरीचा हा व्हायरल व्हिडिओ 2015 चा आहे.

Animal सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. रणबीरचा अभिनय असो, किंवा बॉबीचा अंदाज, दोघांचं एन्ट्री साँग तर खूपच व्हायरल होतंय. Animal सिनेमातून एक नवी नॅशनल क्रशही समोर आली आहे. ती म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी(Tripti Dimri). तृप्ती आणि रणबीरच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावलंय. तृप्तीने मुख्य अभिनेत्री रश्मिकालाही साईडलाईन केल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता तृप्तीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तृप्ती डिमरीचा हा व्हायरल व्हिडिओ 2015 चा आहे. तेव्हा सुरु असलेल्या AWWW या ट्रेंडवर तिने रील बनवले होते. यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. ती एका दुकानदाराशी बोलत आहे. ती त्याला वेगवेगळ्या ड्रेसेसची किंमत विचारत आहे आणि त्यावर Awww अशी प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही इंटरेस्टिंग कमेंट्स केल्या आहेत.

तृप्तीचा हा व्हिडिओ पाहून कमेंट्स सेक्शनमध्ये उधाण आलंय. 'नॅशनल क्रश अपडेटेड','भविष्यात ही बाकी अभिनेत्रींना मागे टाकेल' अशा कमेंट्स तिच्या व्हिडिओवर आल्या आहेत. आता Animal च्या यशानंतर हा व्हिडिओ जास्तच व्हायरल होतोय. तसंच तृप्तीच्या फॅन फॉलोइंगमध्येही जबरदस्त वाढ झाली आहे. बघता बघता तिचे फॉलोअर्स काही हजारांवरुन थेट ३ मिलियनपर्यंत पोहोचले आहेत. 

आगामी प्रोजेक्ट्स 

तृप्ती डिमरी लवकरच विकी कौशलसोबत 'मेरे महबूब मेरे सनम' या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे एक साऊथ प्रोजेक्टही आहे ज्यामध्ये ती रविराजासोबत झळकणार आहे. 'कला','बुलबुल','लैला मजनू' असे हिट सिनेमे देणाऱ्या या अभिनेत्रीकडे आता सिनेमांची रांग लागली आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलबॉलिवूडरणबीर कपूरसोशल मीडिया