मित्रासोबत स्टाईलिश अंदाजात दिसली नव्या नवेली नंदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 7:11 AM
स्टार डॉटर्सच्या वाढत्या गर्दीत नव्या नवेली नंदा हिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन ...
स्टार डॉटर्सच्या वाढत्या गर्दीत नव्या नवेली नंदा हिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन व बिझनेसमॅन निखील नंदा यांची मुलगी नव्या आपल्या फोटोंमुळे कायम चर्चेत असते. अलीकडे नव्याचे ताजे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.सोमवारी नव्या आपल्या एका मित्रासोबत दिसली. दोघेही पीव्हीआर जुहूमध्ये मुव्ही डेटवर पोहोचले. दोघेही थिएटरमधून बाहेर पडणार, तोच मीडियाचे लक्ष या दोघांकडे गेले. आता अमिताभ बच्चनची नात एका मुलासोबत सिनेमा बघायला आली म्हटल्यावर, याची बातमी व्हायलाच हवी. मग काय, मीडियाच्या कॅमेºयांचा एकच लखलखाट झाला. या लखलखाटामुळे नव्याला काहीही फरक पडला नाही. कदाचित तिच्यासाठी हा सवयीचा भाग असावा. पण नव्याचा मित्र मात्र यामुळे चांगलाच अवघडला. यानंतर तो स्वत:चा चेहरा लपवताना दिसला. नव्याने मात्र हा क्षण चांगलाच एन्जॉय केला. मित्र असा तोंड लपवत आहे म्हटल्यावर ती हसत सुटली. तिचे हे हसरे फोटो कॅमेºयात कैद झाले आहेत. ALSO READ : अमिताभ बच्चन फेसबुकवर नाराज; ट्विटरवरून नोंदवली तक्रार!१९ वर्षांची नव्या अतिशय स्टाईलिश आहे. त्यामुळेच येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये दिसली तर नवल वाटायला नको. सोशल मीडियावर नव्या बरीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या मित्रांसोबत अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नव्याने अलीकडे आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. फनलव्हिंग नव्याला पार्टी करणे अतिशय आवडते. आता अशा फनलव्हिंग अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर पाहणे कुणाला बरे आवडणार नाही? अन्य स्टार डॉटर्सप्रमाणे नव्यानेच्याही बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा सिनेप्रेमींना आहे, ती त्यामुळेच. तूर्तास मुम्ही नव्याचे हे फोटो बघा आणि कसे वाटले, ते आम्हाला जरूर कळवा.