बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरु होत्या. पण आता या सर्व अफवा असल्याचं समजतंय. दोघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना स्पॉट झाले. या फोटो आणि व्हिडीओमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना नक्कीच कुठेतरी आता ब्रेक लागला आहे.
रविवारी मुंबईत पाऊस पडत असताना मलायका आणि अर्जुन जेवणासाठी बाहेर गेले होते. दोघांनी एकत्र जेवण केले आणि जेव्हा दोघे बाहेर आले तेव्हा पापाराझींनी त्यांना स्पॉट केले. यादरम्यान दोघेही काही न बोलता थेट त्यांच्या गाडीत बसले.
यावेळी मलायका अरोरा स्टायलिश व्हाईट शर्ट आणि मॅचिंग लोफर्ससह व्हाइट शॉर्ट्स आउटफिटमध्ये दिसून आली. तर अर्जुनने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या ट्रॅक पॅंटमसह पांढरे शूज घातले होते. याचे आता अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
मलायकाने अंशुला कपूर आणि जान्हवी कपूर या बहिणींसह अर्जुनच्या कुटुंबाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर दोघांचे नाते संपले असल्याची चर्चा होत होती. तसेच अर्जुन कपूरचं नाव हे सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलाशी जोडण्यात आले.
मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका ही अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अखेर त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची कबूली दिली होती.