Join us

ट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल यांच्यामध्ये आहे हे कनेक्शन, गायिकेने दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:02 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने पराग अग्रवाल यांचे ट्विटरच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्याबद्दल ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्विटमध्ये लिहिले की, अभिनंदन पराग. मला तुझ्यावर गर्व आहे. आपल्यासाठी मोठा दिवस, या वृत्ताचे सेलिब्रेशन करत आहे. श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल हे खूप जुने मित्र आहेत.

पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून करिअरची सुरूवात केली होती आणि आता ते सीईओ पदाचा कारभार सांभाळणार आहेत. सीईओ बनण्यापूर्वी पराग अग्रवाल २०१७मध्ये ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे आणि स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कम्प्यूटर सायन्समध्ये डॉक्टरेटची डिग्री घेतली आहे.

पराग अग्रवाल २०११ पासून ट्विटरसोबत काम करत आहेत. त्यांना २०१७ साली ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ट्विटरच्या आधी त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्ये काम केले आहे. आता ते ट्विटरचे सीईओ बनले असून त्यांच्यासाठी ही सन्मानाची बाब आहे. ही आनंदाची बातमी समजताच त्यांची जुनी मैत्रीण श्रेया घोषालने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.ट्विटरचे सह संस्थापक आणि माजी सीईओ जॅक यांच्या ट्विटरच्या सीईओ पदाच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल यांची यापदी नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :श्रेया घोषालट्विटर