बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याचा आगामी सिनेमा 'टोटल धमाल' आणि 'चाणक्य'ला घेऊन चर्चेत आहे. चाणक्य हे भारतीय इतिहासातील हुशार व्यक्तिमत्व होते. रिलायंस एंटरटेनमेंट या सिनेमाची निर्मिती करतेय. या सिनेमाला घेऊन एक नवा खुलासा करण्यात आलायं.
'चाणक्य'च्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार यात अजय देवगणचा डबल रोल आहे. या सिनेमाची शूटिंग यावर्षाच्या शेवटपर्यंत सुरु होणार आहे. नीरज पांडे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.
अजय देवगण सध्या 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सिनेमामुळे सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपासून या सिनेमासाठी काजोलला अप्रोच करण्यात आल्याची चर्चा आहे. तर अजयच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये सैफ अली खान नेगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी दोघांनी 1998 साली आलेल्या 'कच्चे धागे' सिनेमात एकत्र काम केले होते. आता या दोघांचा हा चौथा सिनेमा आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार यात सैफ राजपूत अधिकारी उदयभान राठोरची भूमिका साकारणार आहे. उदयभान तोच राजपूत अधिकारी आहे ज्याला औरंगजेबने मुगल आर्मीचा चिफ जय सिंगने नियुक्त केले होते. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार आणि आपल्याकडे येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा विरोध करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात अजय देवगण पाहायला मिळत आहे. त्याशिवाय या पोस्टरमध्ये एक किल्लासुद्धा दिसत असून, त्यावर फडकणारा भगवा झेंडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. चाणक्य तानाजी यांच्या बायोपिकशिवाय अजय रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'मध्ये दिसणार आहे. यात मुख्य भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे.