Join us

नव्या वर्षांची सुनिधी चौहानने पतीला दिली अनोखी भेट.. घरी चिमुकल्याचे झाले आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 7:12 AM

नवीन वर्ष हे गायिका सुनिधि चौहानसाठी खऱ्या अर्थाने लक्की ठरले आहे. त्याला कारण ही तसेच आहे सुनिधीने सोमवारी संध्याकाळी ...

नवीन वर्ष हे गायिका सुनिधि चौहानसाठी खऱ्या अर्थाने लक्की ठरले आहे. त्याला कारण ही तसेच आहे सुनिधीने सोमवारी संध्याकाळी एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मुंबईतल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये सुनिधीने बाळा जन्म दिला आहे. सप्टेंबर 2017मध्ये झालेल्या एका शोमध्ये सुनिधीने लाईव्ह परफॉर्मेंस दिला होता यादरम्यान ती प्रेग्नेंट होती.  प्रेक्षकांनी उभ राहुन तिला स्टँडिंग ओवेशन दिले होते.  यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या शोमध्ये सुनिधीने अनारकली ड्रेस घातला होता. या शो दरम्यान आपल्या गायकीने सुनिधीने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. सुनिधीने संगीतकार हितेश सोनिकसोबत लग्न केले आहे. दोघांनी मिळून आतपर्यंत अनेक सुपरहिट्स गाणी दिली आहेत.  हितेश आणि तिची ओळख झाल्यावर त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले.  सुनिधीने एप्रिल २०१२ मध्ये हितेश सोनिकशी लग्न केले होते. तिचे हे दुसरे लग्न असून वयाच्या अठराव्या वर्षी तिने दिग्दर्शक बॉबी खानसोबत लग्न केले होते. त्यावेळी बॉबी हा ३२ वर्षांचा होता. सुनिधीने इतक्या लहान वयात तिच्यापेक्षा दुप्पट वयाने असलेल्या व्यक्तिशी लग्न करणे तिच्या कुटुंबियांना पटले नव्हते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला सुनिधीच्या घरातल्यांचा प्रचंड विरोध होता. पण घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता तिने लग्न केले. मात्र केवळ वर्षाच्या आता तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला. गेल्या दोन दशकांपासून सुनिधी बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करते आहे. बॉलिवूडच्या टॉप सिंगरच्या लिस्टमध्ये तिचं नावं शामिल आहे. याशिवाय अनेक रिऑलिटी शोच्या जजची जबाबदारी देखील तिनं पार पडली आहे. सुनिधी अतिशय लहानपणापासून गायनाचे शिक्षण घेत आहे. तिचे कुटुंब नवी दिल्लीत राहात होते. तिने वयाच्या चौथव्या वर्षांपासून स्टेजवर गायला सुरुवात केली होती. एका स्टेज शोच्या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री तब्बसूम यांनी तिचे गाणे ऐकले आणि तिच्या घरातल्यांनी सुनिधीला घेऊन मुंबईला यावे असा सल्ला दिला आणि मुंबईत आल्यापासून सुनिधीचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला.