Join us

 दीपवीरने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 1:55 PM

बॉलिवूडचे नवदांम्पत्य रणवीर सिंग व दीपिका पादुकोण आज मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेत. लग्नानंतर पहिल्यांदा रणवीर व दीपिका एकत्र दिसले.

ठळक मुद्देदीपिका व रणवीर सिद्धिविनायक मंदिरात पोहोचताच. यावेळी दोघांच्याही चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

बॉलिवूडचे नवदांम्पत्य रणवीर सिंगदीपिका पादुकोण आज मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेत. लग्नानंतर पहिल्यांदा रणवीर व दीपिका एकत्र दिसले.  दोघेही पारंपरिक पोशाखात सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेत. यावेळी दोघांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. दोघांनीही  पूजाअर्चा करत  आम्हाला सुखाने नांदू दे, अशीच प्रार्थना सिद्धिविनायकाच्या चरणी केली असावी.

दीपिका व रणवीर सिद्धिविनायक मंदिरात पोहोचताच. यावेळी दोघांच्याही चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता. दीपिकाच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि भांगातील कुंकवाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची एकत्र गर्दी केली. मीडियाही याठिकाणी पोहोचला. यावेळी दीपवीरने कुणालाही निराश न करता अगदी हसत हसत मीडियाला पोज दिल्या. चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

दोघांनीही चाहत्यांना हात हलवत अभिवादन केले. सिद्धिविनायकाच्या मस्तकी लीन झालेल्या दीपवीरचे काही हटके फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तेव्हा बघा आणि कसे वाटले ते नक्की सांगा.

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गत १४ व १५ नोव्हेंबरला दीपवीर लग्नबंधनात अडकले. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांनीही लग्नगाठ बांधली. यानंतर २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दोघांच्याही लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दुसरे रिसेप्शन रंगले. या दोन्ही रिसेप्शनमध्ये केवळ दीपिका व रणवीर यांचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार हजर होता. आता येत्या १ डिसेंबरला दीपवीरच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन होणार आहे आणि हे रिसेप्शन खास बॉलिवूडमधील मित्र-मंडळींसाठी आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या रिसेप्शनकडे आणि यातील दीपवीरच्या लूककडे लागले आहे. 

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग