टीव्ही अँकरने सनी देओलला म्हटले सनी लिओनी; ‘बेबी डॉल’ने लगेच केले ट्वीट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 01:37 PM2019-05-23T13:37:05+5:302019-05-23T13:38:16+5:30
एका टीव्ही शोमध्ये एका न्युज अँकरने चुकून सनी देओल यांचा उल्लेख सनी लिओनी असा केला आणि सोशल मीडियाने या अँकरची चूक अगदी बरोबर हेरली.
बॉलिवूड अभिनेते सनी देओल पहिल्यांदा पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा जागेवरून निवडणूक लढवत आहेत. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणारे सनी देओलने मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार, आघाडी घेतलीय. याचदरम्यान एका टीव्ही शोमध्ये एका न्युज अँकरने चुकून सनी देओल यांचा उल्लेख सनी लिओनी असा केला आणि सोशल मीडियाने या अँकरची चूक अगदी बरोबर हेरली.
Leading by How many votes ???? ;) 😜
— Sunny Leone (@SunnyLeone) 23 मई 2019
सध्या अँकरचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. खुद्द सनी लिओनी हिनेही हा व्हिडीओ पाहिला आणि तो पाहून यावरचे ट्वीट केले आहे. ‘मी किती मतांनी आघाडीवर आहे?’, असा सवाल तिने केला. मग काय, सनीच्या चाहत्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्यात.
Arnab : "Sunny Leone...sorry Sunny Deol is leading from Gurdaspur"
— Raj😘♥️INDIAN2 (@Indian2Raj) 23 मई 2019
Modi ke ishq mein devdas ban gya hai ye pagla 🤣🤣#ElectionResults2019pic.twitter.com/1sy1taAxhu
‘तू १३५ कोटी भारतीयांच्या मनांवर राज्य करतेय,’ असे एका चाहत्याने लिहिले. तर अन्य एका युजरने या ट्वीटवरून सनीचे कौतुक केले. ‘कमाल आहे, तू पण निवडणूक निकालांवर लक्ष ठेवून आहेत. तसे तुला तर जिंकायचेच आहे,’ असे या युजरने लिहिले.
You are leading by 135 crore hearts of Indians 😂🙏
— Lagbhag ENGINEER (@EngineerFarzi) 23 मई 2019
😂😂😂😂😂 well everyone loves Sunny Leone— Love You Modi Ji♡ (@iPGaur) 23 मई 2019
— Phenomenal_One 🇮🇳 (@kingslayer112) 23 मई 2019
अर्थात काही चाहत्यांनी सनी देओल यांना सनी लिओनी संबोधण्याबद्दल संतापही व्यक्त केला. एकंदर काय तर, अँकरने चूक केली आणि सनी व तिच्या चाहत्यांचे मनोरंजन झाले.
पंजाबमधील गुरुदासपूरमधून सनी देओल भाजपतर्फे रिंगणात उतरले आहेत. इथे २०१७मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड निवडून आले होते. यंदा निवडणुकांत ते पुन्हा नशीब अजमावत आहेत. वृत्त लिहिपर्यंत मतमोजणीत सनी देओल आघाडीवर होते. मोदींच्या विजयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मोदीजी जिंकत आहेत आणि मी आघाडीवर आहे, याचा मला आनंद आहे. या विजयाच्या मोबदल्यात लोकांसाठी काम करणे, हाच माझा एकमेव उद्देश असेल, असे त्यांनी सांगितले.