Join us

Newton trailer: ​राजकुमार रावचे चाहते आहात, मग ‘न्यूटन’चा ट्रेलर तुम्ही पाहायलाच हवा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 8:42 AM

‘जब तक कुछ नहीं बदलोगे, तब तक कुछ नहीं बदलेगा’, हा विचार घेऊन राजकुमार राव परतला आहे. होय, राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा ट्रेलर आज रिलीज झाला आणि अगदी काही मिनिटांत शेकडो लोकांनी तो पाहिला.

‘जब तक कुछ नहीं बदलोगे, तब तक कुछ नहीं बदलेगा’, हा विचार घेऊन राजकुमार राव परतला आहे. होय, राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा ट्रेलर आज रिलीज झाला आणि अगदी काही मिनिटांत शेकडो लोकांनी तो पाहिला. ‘न्यूटन’च्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर आज प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली. या चित्रपटात राजकुमारने न्यूटन नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. पेशाने साधा बाबू असलेल्या न्यूटनला नक्षलवादाने पोळलेल्या छत्तीसगडच्या एका लहानशा गावात स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक घ्यायची असते. याच एका ध्येयाने त्याला पछाडलेले असते. २ मिनिट ५६ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये न्यूटनचा हाच प्रवास दिसतोय. खरे तर चित्रपटाचा टीजर रिलीज झाला तेव्हाच याच्या कथेबद्दलची कल्पना प्रेक्षकांना आली होती. पण ट्रेलरमध्ये त्यापेक्षा बरेच काही तुम्हाला दिसते. चित्रपटात मुख्य पात्र साकारणाºया न्यूटनचे नाव न्यूटन का पडले? लोकांसोबत तो इतके गंभीर का वागतो? याची उत्तरे ट्रेलरमध्ये आहेत. ‘सुलेमानी किडा’चे दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी या पॉलिटीकल ब्लॅक कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.चित्रपटात राजकुमार राव याच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अंजली पाटील, रघुवीर यादव, संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये फोरम सेक्शनमध्ये या चित्रपटाने बेस्ट आर्ट सिनेमाचा अवार्ड पटकावला होता. येत्या २२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तोपर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघायलाच हवा आणि शिवाय तो कसा वाटला, हेही आम्हाला सांगायला हवे. बघा तर मग!!