प्रियंका चोप्रा सध्या पती निक जोनाससोबत पॅरीसमध्ये आहे. निकचा भाऊ जो त्याची गर्लफ्रेन्ड सोफी टर्नरसोबत दुस-यांदा लग्न करतो. साहजिकच अख्खे जोनास कुटुंब पॅरीसमध्ये आहे. प्रियंकाही या लग्नासाठी पॅरीसमध्ये पोहोचली आहे. याचदरम्यान प्रियंका एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात वाचली. पती निकच्या सतर्कतेमुळेच ती वाचली, असे म्हणायलाही हरकत नाही. तूर्तास या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बोट पार्टीदरम्यान ही घटना घडली. मित्रपरिवारासाठी आयोजित या पार्टीत निक आणि प्रियंकाही सहभागी झाले होते. पार्टी ऐन रंगात आली असताना बोटीच्या कडेला उभ्या असलेल्या प्रियंकाचा तोल गेला. मात्र समोरच उभ्या असेलेल्या निकने तिला सावरले आणि प्रियंका पडता पडता वाचली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहिओ पाहिल्यानंतर निक नसता तर काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. व्हिडीओमध्ये सगळे ड्रिंक एन्जॉय करत आहेत. याचदरम्यान प्रियंकाचा तोल जातो. ती पडणार, असे दिसताना निक लगेच तिला सावरतो. यासगळ्यात निकचे ड्रिंक समुद्रात पडते. यानंतर प्रियंका व निक दोघेही हसत सुटतात. दोघेही हसत आहेत म्हटल्यावर सगळे त्यांच्याकडे बघतात.