Join us

निक जोनासने सांगितले त्याच्या व प्रियांका चोप्राच्या लव्हस्टोरीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 5:25 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा नुकताच मुंबईत साखरपुडा पार पडला. आता हे दोघे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.

ठळक मुद्देकॉमन फ्रेंडमुळे भेटले प्रियांका व निकनियतीनेच आम्हाला एकत्र आणले - निक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा नुकताच मुंबईत साखरपुडा पार पडला. आता हे दोघे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. मात्र या दोघांचे अफेयर जमले कसे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. निक आणि प्रियांका यांनी लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतल्यामुळे या दोघांच्या मित्रपरिवाराबरोबरच त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. या दोघांची प्रेमकथा जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहे. मात्र या दोघांनीही कधीही त्यांची लव्हस्टोरी जगजाहीर केली नव्हती. परंतु एका कार्यक्रमामध्ये खुद्द निकने याबद्दल खुलासा केला आहे.

काही दिवसापूर्वी निक आणि प्रियांकाने द टुनाइट शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जिमी फॉलन याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत निकने त्यांची लव्हस्टोरी सांगितली. ‘एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून माझी आणि प्रियांकाची पहिली भेट झाली. या भेटीनंतर आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र होतो. मेसेजच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी बोलायचो. त्यावेळी आमच्या मनातही लग्नाविषयी किंवा प्रेमाविषयी कोणतीही भावना नव्हती. पण जसजशी ओळख वाढू लागली आम्ही एकमेकांमध्ये गुंतत गेलो. पहिल्या भेटीनंतर सहा महिने उलटल्यावर आम्ही भेटण्याचा निर्णय घेतला. या भेटीत आमची साधी चर्चा झाली. त्यानंतर मे २०१७मध्ये आम्ही मेट गालाच्या रेड कार्पेटवर एकत्र दिसून आलो. मात्र यावेळी देखील आमच्यात केवळ निखळ मैत्रीच होती’.पुढे तो म्हणाला, ‘मेट गालानंतर असे अनेक किस्से झाले की ज्यामुळे आम्ही सतत एकमेकांना भेट राहिलो. थोडक्यात आम्ही एकमेकांपासून दूर गेलो तरी आमचे नशीब आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते आणि पुढे तसेच झाले आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे आम्हाला जाणवले. त्यामुळेच आम्ही साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. आमच्या नियतीनेच आम्हाला एकत्र आणलेे आहे’.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास