Join us

निर्भया प्रमाणेच ‘या’ चित्रपटातूनही मिळाला पीडितांना न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:13 PM

२०१२ मध्ये राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया सामुहिक अत्याचार प्रकरणी सात वर्षानंतर नुकताच न्याय मिळाला. बॉलिवूडचा विचार केला तर निर्मात्यांनी अशा प्रकारच्या घटनांवर नेहमी प्रकाशझोत टाकला आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यात पीडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२०१२ मध्ये राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया सामुहिक अत्याचार प्रकरणी सात वर्षानंतर नुकताच न्याय मिळाला. त्यानंतर रस्त्यावर उतरुन लोकांनी दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली होती.बॉलिवूडचा विचार केला तर निर्मात्यांनी अशा प्रकारच्या घटनांवर नेहमी प्रकाशझोत टाकला आहे.

-रवींद्र मोरे२०१२ मध्ये राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया सामुहिक अत्याचार प्रकरणी सात वर्षानंतर नुकताच न्याय मिळाला. तिहाड जेलमध्ये शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता विनय, अक्षय, मुकेश आणि पवन गुप्ता या दोषींना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली. १६ डिसेंबर, २०१२ राजी देशाच्या राजधानी झालेल्या या घटनेने संपूर्ण देशाला हादरुन सोडले होते. त्यानंतर रस्त्यावर उतरुन लोकांनी दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली होती. बॉलिवूडचा विचार केला तर निर्मात्यांनी अशा प्रकारच्या घटनांवर नेहमी प्रकाशझोत टाकला आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यात पीडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली आहे.* भूमि

२०१७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात संजय दत्त आणि आदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत होते. यात संजय दत्तने एका वडिलांची भूमिका साकारली होती. तर अदिती त्याच्या मुलीची भूमिकेत होती. मुलीवर झालेल्या दुष्कृत्यानंतर तिचा बाप तिला न्याय मिळण्यासाठी सर्वांशी कसा लढतो हे यात दाखविण्यात आले आहे.* दुश्मन१९९८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात काजोल डबल रोलमध्ये होती. दोन बहिणींच्या या कथेत एका बहिणवर अत्याचार होतो आणि त्यानंतर दुसरी बहीण दोषींना शिक्षा देण्यासाठी अतोनात प्रयत्न करते. यात संजय दत्त आणि आशुतोष राणादेखील होते.* काबिल

ऋतिक रोशन आणि यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात हे दोघेही अंध असतात. ऋतिकचे लग्न यामीसोबत होते आणि दोघेही एकमेकांचा सहारा बनतात. यामी गौतमवर अत्याचार घडल्यानंतरही पोलीस काही खास अ‍ॅक्शन घेत नाहीत. तेव्हा स्वत: ऋतिक रोशन दोषींना शिक्षा देण्याचा निर्णय घेतो.* मातृहा चित्रपट आईने घेतलेल्या सुडाची कथा आहे, जिच्या मुलीसोबत तिच्या डोळ्यांदेखतच अत्याचार होतो. एक आई सर्व समस्यांशी सामना करत सिस्टम आणि सर्व जगाशी लढते. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात रवीना टंडन मुख्य भूमिकेत होती.* दिल्ली क्राइम

निर्भया कांडशी प्रेरित वेबसीरिज 'दिल्ली क्राइम' २०१९ मध्ये रिलीज झाली होती. या वेबसीरिजची खूपच प्रशंसा झाली होती. यात शेफाली शाहला डीसीपीच्या मुख्य भूमिकेत दाखविण्यात आले होते. सोबतच रसिका दुग्गल, राजेश तैलंग आणि आदिल हुसैनदेखील मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :बॉलिवूडसंजय दत्तहृतिक रोशनरवीना टंडन