डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत हे मृत्यूशी झुंज देतो आहे. निशिकांत कामत यांचं निधन झाल्याच्या वृत्तानंतर, रितेश देशमुखने लगेचच ट्विट करून त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे आणि त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं आहे. रितेश देशमुखने ट्विट करत लिहिले, निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर आहे. तो मृत्यूशी झुंज देतो, त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करुया. असे ट्विट रितेशने काही वेळापूर्वी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे. निशिकांत कामतला यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास आहे आणि त्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Nishikant Kamat Death Rumors : निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, मृत्यूशी झुंज देतोय: रितेश देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 1:21 PM