जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असाल तर अर्थातच तुमची हौससुद्धा तितकीच महागडी असेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी यांना मौल्यवान दागिन्यांची भारी हौस आहे. आज नीता अंबानी यांच्याकडे कोणत्याच गोष्टींची कमतरता नाही. नीता अंबानी या बऱ्याचदा पारंपारिक अंदाजात दिसतात. साडी आणि दागिणे परिधान करणं त्या सर्वात जास्त पसंत करतात. नुकतेच त्यांना मिस वर्ल्ड फायनलमध्ये 'ब्युटी विथ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड'ने गौरविण्यात आलं. यावेळी त्यांनी नेसलेली साडी आणि त्यावरील दागिने सध्या चर्चेत आले आहेत.
निता अंबानी या काळ्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये दिसल्या. या साडीवरील डिझायनर ब्लाऊजवर मुगल सम्राट शाहजहांची यांची कलगी लावण्यात आली. निता यांनी या कलगीला बाजूबंदासारखं कॅरी केलं. या कलगीची किंमत तब्बल 200 कोटींहून अधिक असल्याची म्हटलं जात आहे. या कलगीची सर्वात विशेष बाब म्हणजे हे सोन्याने बनले असून त्यात डायमंड, रूबी आणि स्पिनल्स आहे. याबद्दलची माहिती इंस्टा पेज 'टोपोफिलिया' दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या लूकचीच चर्चा सुरू आहे. निता अंबानी यांना अनेकदा अत्यंत महागड्या साड्यांमध्ये पाहिले गेले आहे. कौटुंबिक कार्यक्रम किंवा लग्नसमारंभात त्या नेहमी भरजरी दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यांची ज्वेलरी देखील खूप महाग असते. नीता अंबानी या आलिशान बंगल्यात राहत असून त्यांचे शौक देखील तितकेच मोठे आहेत. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि प्रायव्हेट जेटही आहे.