Join us

चित्रीकरणाचा झाला तब्बल तीन महिन्यांनंतर श्रीगणेशा, एन.डी. स्टुडिओत सुरू झाले चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 7:41 PM

नितिन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओत ८० दिवसांनंतर चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याने याचा पहिला क्लॅप स्वतः नितिन चंद्रकांत देसाई यांनी दिला.

ठळक मुद्देबॉम्बे डे असे या वेबसिरिजचे नाव असून ही एका क्राईम थ्रिलर सिरिज आहे. नितिन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओत ८० दिवसांनंतर चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याने याचा पहिला क्लॅप स्वतः नितिन चंद्रकांत देसाई यांनी दिला.

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात सगळीकडे लॉकडाऊन आहे. सध्या लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. अतिशय कमी लोकांच्या उपस्थित आणि लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत चित्रीकरण करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. पण अद्याप मुंबईत कुठेही चित्रीकरणाला परवानगी देण्यात आलेली नाहीये. पण मुंबईच्या जवळच असलेल्या कर्जत येथील एन.डी.स्टुडिओत एका वेबसिरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

बॉम्बे डे असे या वेबसिरिजचे नाव असून ही एका क्राईम थ्रिलर सिरिज आहे. नितिन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओत ८० दिवसांनंतर चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याने याचा पहिला क्लॅप स्वतः नितिन चंद्रकांत देसाई यांनी दिला. महाराष्ट्र सरकारने सांगितलेल्या सगळ्या नियमांचे वेबसिरिजच्या मुर्हूतादरम्यान पालन करण्यात आले.

एन.डी.स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू झाल्यानंतर आता इतर ठिकाणी देखील चित्रीकरणाला परवानगी मिळेल आणि लवकरच मोठ्या प्रमाणात चित्रीकरणाला सुरुवात होईल अशी चित्रपट, मालिकेच्या निर्मात्यांना खात्री आहे.

बॉम्बे डे या वेबसिरिजचे लेखन भरत सुनंदा यांनी केले असून तेच या वेबसिरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. या वेबसिरिजमध्ये काही सत्य घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मुंबईतील काही गुन्हेगारांच्या आयुष्यावर आधारित ही वेबसिरिज आहे. प्रसिद्ध एन्कॉन्टर स्पेशालिस्ट विजय साळस्कर एका गुन्हेगाराचा अंत कशाप्रकारे करतात हे या वेबसिरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाई