Join us

‘केदारनाथ’च्या सेटवर ड्रग्ज घ्यायचे सुशांत व सारा? या प्रश्नावर नीतीश भारद्वाज काय म्हणाले वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 12:04 PM

‘केदारनाथ’ या सिनेमाच्या सेटवर सुशांत आणि सारा अली खान ड्रग्ज सेवन करत असल्याचा खुलासा रिया चक्रवर्तीने एनसीबीला दिलेल्या जबाबात केलाय.

ठळक मुद्देसुशांतनं 14 जून 2020 रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला येत्या 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अद्याप सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक धक्कादायक खुलासे झालेत. सुशांत ड्रग्ज घेत होता, असे सांगून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने खळबळ उडवून दिली. ‘केदारनाथ’ या सिनेमाच्या सेटवर सुशांत आणि सारा अली खान (Sara Ali Khan ) हे ड्रग्ज सेवन करत असल्याचा खुलासा तिने एनसीबीला दिलेल्या जबाबात केला. आता ‘केदारनाथ’मध्ये सुशांत व सारासोबत काम करणारे अभिनेते नीतीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिलीय. टाइम्स ऑफ  इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नीतीश यांना याबाबत विचारण्यात आले. ‘केदारनाथ’च्या सेटवर सुशांतला ड्रग्जचे व्यसन लागले हे खरे आहे का? असे विचारले असता त्यांनी यावर सविस्तर उत्तर दिले.

काय म्हणाले नीतीश भारद्वाज?‘एक दिवस पुजा गौर मला टीव्ही इंडस्ट्रीत होत असलेल्या बदलांबाबत सांगत होती. त्यावेळी ड्रग्सचा विषय आला होता. सारा अली खानही आमच्या चर्चेत सहभागी झाली होती. मला सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत सुरू असलेल्या वाढत्या ड्रग्स सेवनाबद्दल माहिती असल्याचे ती म्हणाली होती. मला आजही आठवतंय, त्यावेळी मी साराला ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. कारण साराचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यावेळी साराने मला अतिशय विश्वासाने मी कधीच ड्रग्जला हात देखील लावला नसल्याचे म्हटले होते. ना आत्तापर्यंत ड्रग्जला हात लावल, ना लावणार, असे ती म्हणाली होती.

सेटवर सुशांत त्यावेळी सिगारेट ओढत होता. पण तो ड्रग्ज घेत नव्हता, याची मला खात्री आहे. तो चंचल बुद्धीचा व्यक्ती होता. ड्रग्ज घेणा-या व्यक्तीची अशी बुद्धी नसते. तो ड्रग्ज घेत असता तर तो इतक्या समजुतदारपणाच्या गोष्टी करूच शकला नसता, असे नीतीश म्हणाले. मी स्वत: धुम्रपान करत नाही. पण मला हे माहितेय की जेव्हा ड्रग्जची सिगारेट ओढतो तेव्हा एक वेगळा वास सुटतो. मी त्यावेळी सारा आणि सुशांतला कधीच नशेत किंवा कोणत्या ट्रीपवर गेलेले नाही पाहिले. सेटवर ते खूपच नॉर्मल राहत होते, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसारा अली खान