Join us

नो मेकअप लूकमध्येही जॅकलिन फर्नांडिस दिसते तितकीच सुंदर, फोटो पाहून तुम्हीही कराल प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 18:12 IST

जॅकलिनच्या विना मेकअप फोटोवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सध्या नो मेकअप सेल्फीचा ट्रेंड असून बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्री विनामेकअप फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने देखील इंस्टाग्रामवर विनामेकअप फोटो शेअर केला आहे. या फोटोतही ती खूप सुंदर दिसते आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या विना मेकअप लूकला खूप लाइक्स मिळत आहेत.  नो मेकअप लूकमध्येही ती खूप छान दिसते आहे.

जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता. जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे. तिचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते. जॅकलिनला इंग्रजी, हिंदीशिवाय फ्रेंच, स्पॅनिश आणि अरेबिक भाषादेखील येते. तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.

जॅकलिनने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नुकताच जॅकलिनचा ड्राइव्ह हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत होते.ती आता कार्तिक आर्यनसोबत किरिक पार्टी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

तसेच किकच्या सिक्वलमध्ये ती सलमानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस