बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अचानक आलेल्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूडच्या कलाकारांना धक्का बसला आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
दिग्दर्शक सुजीत सरकारने ट्विट करून माहिती दिली की इरफान खानचे निधन झाले आहे. सुजीत सरकार यांनी लिहिले की माझा प्रिय मित्र इरफान... तू लढत राहिलास...लढत राहिलास आणि लढत राहिलास. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत राहील आणि आपण पुन्हा भेटू... श्रद्धांजली.
करण जोहरने ट्विट केले की, धन्यवाद, इतक्या चांगल्या सिनेमांसाठी. कलाकारांची व्याप्ती वाढविण्यासाठी आभारी आहे. आपल्या सिनेमांना उंचीवर नेऊन ठेवला त्यासाठी आभारी आहे. आम्हाला नेहमी तुझी आठवण येईल. तुझे अस्तित्व आमच्या जीवनात नेहमी राहिल. संपूर्ण सिनेइंडस्ट्री तुम्हाला सलाम करतो.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहत म्हटलं की, इरफान खानचे निधन झाल्याचे वृत्त नुकतेच समजले. हे खूप त्रासदायक आणि खेदजनक बातमी आहे. अप्रतिम टॅलेंट, एक चांगला सहकलाकार, जागतिक सिनेमात योगदान असणारा कलाकार...खूप लवकर आपल्याला सोडून गेला. पोकळी निर्माण झाली आहे.
अक्षय कुमारने ट्विट केले की, खूप वाईट बातमी आहे. अचानक इरफान खानच्या निधनाचे वृत्त ऐकले. आमच्या काळातील सर्वाेत्तम कलाकारांपैकी एक होता. त्याच्या कुटुंबाला या कठीण काळात सामोरे जाण्यासाठी ताकद देवो.
भूमी पेडणेकरने ट्विट केले की, इरफान खान सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि दुःखही वाटले. कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. तुम्ही आमच्या मनात नेहमी जीवंत राहणार आहात. आमचे मनोरंजन केले आणि इतके चांगले परफॉर्मन्स दिले, त्यासाठी आभारी आहे. तुम्ही आमच्यासाठी अभिनयाची शाळा आहात आणि नेहमीच प्रेरणादायी आहात. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.
शबाना आझमी यांनी ट्विटरवर लिहिले की, सकाळीच इरफान खानच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. खूप लवकर गेला. खूप पॉवरफुल अभिनेता आणि कशी कर्करोगावर शौर्याने मात केली होती. हे खूप मोठे नुकसान आहे फक्त त्याच्या कुटुंबाचे नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीचे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.
प्रियंका चोप्राने ट्विट केले की,तुम्ही जे काही केले ते जादूसारखे होते. तुमचे कौशल्य अनेकांना मार्ग दाखवले आहेत आणि कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तुम्हाला खूप मिस करेन. कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.
अनुष्का शर्माने लिहिले की, हृदयावर दगड ठेवून मी हे ट्विट करत आहे. अद्भूतपूर्व कलाकार, त्यांच्या परफॉर्मन्स माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष केला पण खेद म्हणजे आज ते आपल्याला सोडून गेले. आरआयपी इरफान खान. ओम शांती.
सोनम कपूरने ट्विट केले की, आत्म्यास शांती लाभो. तुमचा दयाळूपणा माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता जेव्हा माझ्यात आत्मविश्वास नव्हता. तुमच्या कुटुंबियासोबत व जवळच्या व्यक्तींच्या दुःखात सहभागी आहे.
लता मंगेशकर यांनी ट्विट केले की, खूप गुणी अभिनेता इरफान खानजीच्या निधनाचे वृत्त ऐकून मला खूप वाईट वाटले. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करते.