Join us

'हमें कोई अलग नहीं कर सकता...'; 'कराची टू नोएडा'साठी सीमा-सचिननं दिली ऑडिशन, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:29 AM

Seema Haider And Sachin : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. दोघांच्या लव्हस्टोरीची भारतापासून पाकिस्तानपर्यंत चर्चा होत आहे. सर्वत्र चर्चा रंगलेल्या या जोडीवर चित्रपट बनणार आहे.

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. दोघांच्या लव्हस्टोरीची भारतापासून पाकिस्तानपर्यंत चर्चा होत आहे. सर्वत्र चर्चा रंगलेल्या या जोडीवर चित्रपट बनणार आहे. 'कराची टू नोएडा' असे या चित्रपटाचे नाव आहे. जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अमित जानी हा चित्रपट बनवणार आहेत. असा खुलासा अमित जानी यांने ८ ऑगस्ट रोजी केला होता. अवघ्या एका दिवसानंतर या चित्रपटाच्या ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर एक क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.

सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसद्वारे चित्रपट बनवला जात आहे. आता या चित्रपटात कोणकोणत्या व्यक्तिरेखा साकारणार यासाठी ऑडिशन सुरू झाले आहे. जानी प्रॉडक्शनने ऑडिशनचा व्हिडिओ रिलीज केला आहे. ज्यामध्ये सीमा हैदरच्या भूमिकेसाठी अभिनेत्री आणि मॉडेल्सचे ऑडिशन घेतले जात आहे. या ऑडिशनचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात सीमा आणि सचिनच्या भूमिकेसाठी ऑडिशनसाठी आलेले कलाकार फोनवर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. फोनवर बोलताना दिसणारी मुलगी सीमा हैदर सारखीच आहे, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अमित जानींना मिळाली जीवे मारण्याची धमकीअलीकडेच मेरठचे चित्रपट निर्माते अमित जानी यांनीही या संदर्भात सीमा हैदर यांची भेट घेतली होती आणि त्यांनी हा चित्रपट करण्याची ऑफर दिली होती. सीमा हैदरने असेही सांगितले की, यूपीएटीएसकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर तिला या चित्रपटात काम करायचे आहे. पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला चित्रपटात काम दिल्याबद्दल अमित जानी यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे वृत्त आहे. याबाबत अमित जानी यांनी मेरठ आणि नोएडा पोलिसांकडे तक्रार केली आहे. मौनू मानेसरने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे आपल्याला हल्ल्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अमित जानी यांनी सिनेमाच्या कामाला केली सुरुवातमिळालेल्या माहितीनुसार, अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटासाठी नाव नोंदणी केली आहे. ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ बनवणारे निर्माते अमित जानी यांनी सीमा आणि अंजू यांच्या जीवनकथेवर चित्रपट बनवण्याचे काम सुरू केले आहे. सीमा हैदरवर लवकरच ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचे थीम साँगही लाँच होणार असल्याचे बोलले जात आहे.

या चित्रपटातून सीमा करणार पदार्पणयापूर्वी अशा बातम्या येत होत्या की सीमा हैदर तिच्या 'कराची टू नोएडा' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र सीमा आणि प्रॉडक्शन हाऊसकडून यावर अद्याप काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र सीमा अभिनयात पदार्पण करणार हे नक्की. राजस्थानमधील उदयपूर येथील शिंपी कन्हैया लालच्या हत्येवर चित्रपट बनवला जात आहे. 'ए टेलर मर्डर स्टोरी' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात सीमा हैदर रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे.