आपल्या दोन लाडक्या बहिणींसोबत फोटोसाठी पोझ देणारा हा मुलगा आज बॉलिवूड चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अॅक्शन स्टार आहे. ज्याची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. लग्नानंतर बॉलिवूडमध्ये एंट्री करणं आणि काम मिळणं थोडसं कठीण मानलं जातं. मात्र या अभिनेत्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर हे चुकीचं असल्याचं सिद्ध केलंय. एक काळ असा होता की याचे सिनेमे थिएटरमध्ये पाहण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागायच्या.
नव्वदच्या दशकातील बॉलिवूडमधील हिट कलाकारांमध्ये त्याची गणना होते आणि आजही त्यांनी आपली फिल्मी कारकीर्द सुरू ठेवली आहे. एवढ्या हिंट नंतर तुम्हाला कळलं असेल की हा अभिनेता कोण आहे ते. नसेल तर आम्ही सांगतो फोटोत बहिणीसोबत पोझ देणार हा चिमुकला सुनील शेट्टी आहे. सुनील शेट्टी यांचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकातील मंगळूर येथील मुल्की गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यानंतर त्याचे वडील वीरप्पा शेट्टी यांना त्या शहरात काम मिळत नसल्याने ते कामाच्या शोधात मुंबईत आले. ते एका इमारतीत सफाई कामगार म्हणून काम करू लागले. संपूर्ण कुटुंब जुहू परिसरात राहू लागले. पुढे त्यांचे वडील ज्या ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करायचे त्या सर्व इमारती सुनील शेट्टीने विकत घेतल्या.
सुनील जेव्हा चित्रपटात काम करायला आला तेव्हा लोकांनी त्याला ही इंडस्ट्री सोडायला सांगितले, पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. तर सुनील शेट्टी नव्वदच्या दशकातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून काम करत राहिला.
सुनील शेट्टीच्या पत्नीचे नाव माना शेट्टी आहे. तसे, तिचे खरे नाव मोनिषा कादरी आहे. मानाचे वडील गुजराती मुस्लिम आणि आई पंजाबी हिंदू होती. प्रसिद्धी मिळवण्याआधीच सुनील शेट्टीने १९९१ मध्ये मनासोबत लग्न केले. मानाशी लग्न केल्यानंतर सुनील शेट्टी चित्रपट जगताकडे वळला. पण विवाहित आणि नवोदित नायकाला नायिका मिळणे कठीण जात होते. त्यानंतर दिव्या भारतीने सुनील शेट्टीसोबत काम करण्यास होकार दिला आणि दोघेही बलवान या चित्रपटात एकत्र दिसले, जो खूप गाजला. त्यानंतर सुनील शेट्टीने कधी मागे वळून पाहिलं नाही.