सत्यमेव जयते सिनेमा अजून रिलीज देखील झाला नाही तोवर नोरा फतेहीनेसलमान खानच्या 'भारत' सिनेमात तिची एंट्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान फक्त डान्स नंबर नाही तर एक महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार सिनेमात नोरा एक विदेशी मुलीची भूमिका साकारणार आहे. ती भारतमध्ये माल्टामधल्या लॅटिन मुलीची भूमिका साकारणार आहे.
दिग्दर्शक अली अब्बास जफर नोराच्या भूमिकेबाबत बोलताना म्हणाला की, सिनेमात ती एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती 80 च्या दशकातील भागात दिसणार आहे. तसेच ती सलमान खान आणि सुनीलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला प्रियांका व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न. या सिनेमात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते. प्रियांका चोप्रा सलमानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सलमान खानची वेगवेगळी रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळतील. म्हणजे तरूण ते वृद्ध अशा वेगवेगळ्या रूपात तो दिसेल. केवळ सलमानचं नाही तर प्रियांका चोप्रा ही सुद्धा यात पाच वेगवेगळ्या रूपात आहे.वाढत्या वयासोबत प्रोस्थेटिक्सच्या मदतीने तिचे लूक्स तयार केले जातील.